LIVE Updates : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार - उद्धव ठाकरे

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 06, 2022, 17:50 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 3 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  16:44 (IST)

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
  'कितीही बोली लावली तरी निष्ठा विकली जाऊ शकत नाही'
  'पसाराभर नासलेली लोकं असल्यापेक्षा...'
  '...मूठभर निष्ठावान असतील तर मैदान जिंकू शकतो'
  'मुख्यमंत्रिपद हवं असतं तर क्षणाभरात सोडलं नसतं'
  माझ्यासोबत निष्ठावंत कडवट शिवसैनिक - उद्धव ठाकरे
  शिवसेनेचा दसरा मेळावा 'शिवतीर्था'वरच - उद्धव ठाकरे
  'शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात सविस्तर बोलणार'
  'आतापर्यंत बोलताना मुख्यमंत्रिपदाचा मास्क असायचा'
  जपून बोलावं लागायचं, आता तसं नाही - उद्धव ठाकरे

  'भास्कर जाधवांना विचार करूनच नेतेपदाची जबाबदारी'
  आता लढण्याची वेळ आली आहे - उद्धव ठाकरे
  भास्करराव काय करू शकतात हे 12 आमदारांना विचारा

  15:10 (IST)

  मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेनंही कंबर कसली
  शिवसेना विभागप्रमुखांची 'मातोश्री'वर बैठक संपन्न
  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं मार्गदर्शन
  महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणीसाठी घटनापीठ
  उद्या घटनापीठाची स्थापना होणार - सुप्रीम कोर्ट
  सरन्यायाधीश लळीत यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठ 

  नाशिक पोलीस आणि गणेश मंडळांची बैठक
  21 गणेश मंडळाचे पदाधिकारी होते उपस्थित 
  स.11 ते रात्री 12 पर्यंत मिरवणुकीला परवानगी
  मिरवणुकीला उशीर केल्यास होणार गुन्हे दाखल 
  पारंपरिक वाद्य, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका 

  13:51 (IST)

  लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान
  लालबागच्या राजाला 5 दिवसांत अडीच कोटी
  दानपेटीत 2 कोटी 49 लाख 50 हजारांचं दान
  सोनं 2518.780 ग्रॅम तर 29164 ग्रॅम चांदी

  13:24 (IST)

  मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेनेही कंबर कसली
  शिवसेनेच्या विभाग प्रमुखांची 'मातोश्री'वर बैठक
  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
  महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत बैठक

  13:11 (IST)

  बालविवाह झालेली मुलगी 14 व्या वर्षी गर्भवती
  कोल्हापुरातील दऱ्याचे वडगावमधील घटना
  अवघ्या साडेबाराव्या वर्षी लग्न झाल्याचं उघड
  आई-वडील, पतीसह 5 जणांवर गुन्हे दाखल

  12:23 (IST)

  कोल्हापूर - गणेशोत्सव मंडळं आणि पोलिसांची बैठक
  पोलीस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित
  पर्यायी विसर्जन मार्गांबाबत बैठकीत चर्चा सुरू

  12:14 (IST)

  राज ठाकरे 18 सप्टेंबरला नागपूर दौऱ्यावर 
  राज ठाकरे चंद्रपूर, अमरावतीलाही देणार भेट
  मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
  पक्षवाढीसाठी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देणार

  12:9 (IST)

  देशभरात जवळपास 30 ठिकाणी ईडीच्या धाडी
  ईडीचं 5 राज्यांमध्ये धाडसत्र, सूत्रांची माहिती
  दिल्ली, लखनौ, गुरुग्राम, चंदिगडमध्ये ईडीचे छापे
  मुंबई, हैदराबाद, बंगळुरूमध्येही ईडीची छापेमारी

  11:4 (IST)

  दापोली - मुरुडमधील वादग्रस्त रिसॉर्ट प्रकरण
  भाजप नेते किरीट सोमय्या उद्या रत्नागिरीत
  साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात घेणार आढावा
  रिसॉर्ट पाडण्याच्या प्रक्रियेबाबत चाचपणी

  10:8 (IST)

  देशात अनेक गड उद्ध्वस्त झालेत - बावनकुळे
  कुठलाही गड कायम राहत नाही - बावनकुळे
  'भाजप-सेना लोकसभेच्या 45 हून अधिक जागा जिंकेल'
  'विधानसभेत 200 हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य'

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स