मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिला का नाही? कहाणीमध्ये नवा ट्विस्ट!

उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिला का नाही? कहाणीमध्ये नवा ट्विस्ट!

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) जून महिन्यामध्ये राजकीय भूकंप झाला आणि 29 जूनला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

    मुंबई, 8 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) जून महिन्यामध्ये राजकीय भूकंप झाला आणि 29 जूनला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंड केल्यामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना फेसबूक लाईव्ह केलं, या लाइव्हमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपण फक्त मुख्यमंत्रीपदच नाही तर आमदारकीचाही राजीनामा देत असल्याचं घोषित केलं. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं असलं तरी विधिमंडळाच्या वेबसाईटवर अजूनही उद्धव ठाकरे यांचं नाव शिवसेना आमदारांच्या यादीत दिसत आहे. मुख्य म्हणजे ही यादी 8 जुलै 2022 ला म्हणजेच उद्धव ठाकरेंनी आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केल्याच्या 9 दिवसांनी अपडेट करण्यात आली आहे. मग उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिला का नाही? राजीनामा दिला असेल तर तो प्रक्रियेमध्ये अडकला आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विधिमंडळाच्या वेबसाईटवर विधान परिषद सदस्यांच्या यादीत शिवसेनेचे 12 आमदार आहेत, ज्यात उद्धव ठाकरेंचाही समावेश आहे. या यादीमध्ये उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ 14 मे 2020 ते 13 मे 2026 पर्यंत दाखवण्यात आला आहे. विधिमंडळाच्या वेबसाईटनुसार शिवसेनेचे आमदार कोण? विधिमंडळाच्या वेबसाईटवर शिवसेनेचे 12 आमदार दाखवण्यात आले आहेत. यामध्ये सचिन आहिर, मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे, दुष्यंत चतुर्वेदी, उद्धव ठाकरे, नरेंद्र दराडे, अंबादास दानवे, अनिल परब, आमश्या पाडवी, विलास पोतनीस, विप्लव बाजोरिया, सुनिल शिंदे यांचा समावेश आहे. विधिमंडळाच्या वेबसाईटवरची शिवसेना आमदारांची यादी नोव्हेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी पुढच्या 6 महिन्यांमध्ये त्यांना विधिमंडळाच्या एका सदनाचं सदस्य होणं गरजेचं होतं, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेचा मार्ग निवडला. विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या