कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद

कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद

जोतिबा चौगले हे 2009 साली सैन्यदलात दाखल झाले होते. जम्मूमध्ये राजुरी इथं ते कार्यरत होते.

  • Share this:

कोल्हापूर, 16 डिसेंबर : जम्मू काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आलं आहे. कोल्हापूरच्या महागाव गावचे जवान शहीद अतिरेक्यांच्या चकमकीत शहीद झाल्याची घटना 16 डिसेंबरला घडली आहे. जोतिबा गणपती चौगले असं वीरमरण आलेल्या जवानाचं नाव आहे. चौगले हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावचे रहिवासी होते. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

जोतिबा चौगले हे 2009 साली सैन्यदलात दाखल झाले होते. जम्मूमध्ये राजुरी इथं ते कार्यरत होते. आपले कर्तव्य पार पाडत असताना अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत चौगले यांना वीरमरण आलं. उद्या दुपारी महागाव गावात चौगले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर ही बातमी समजताच चौगले घरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या परमेश्वर बाळासाहेब जाधवर या पुत्रालाही वीरमरण आले होते.

युद्धाभ्यासात जवानाला वीरमरण, कुटुंबीयांशी 'ते' बोलणे ठरले शेवटचे

राजस्थान जैसलमेर येथे युद्धाभ्यासात जवान परमेश्वर बाळासाहेब जाधवर (वय-26) शहीद झाल्याची घटना घडली होती. परमेश्वर हे धारूर तालुक्यातील घागरवाडा येथील रहिवासी होते. परमेश्वर जाधवर हे 514 वायुसेना रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इतर बातम्या - भर उत्सवात फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट, एका तरुणीचा मृत्यू 5 जण गंभीर

कुटुंबीयांशी 'ते' बोलणे ठरले शेवटचे..

परमेश्वर यांचे माध्यमिक शिक्षण उमरी (ता.माजलगाव) येथे तर उच्चशिक्षण पिंपळनेर येथे झाले होते. परमेश्वर जाधवर यांची पाच वर्षापूर्वी बीड येथील सैन्य भरतीच्या माध्यमातून भारतीय सैन्यात दाखल झाले होते. सध्या परमेश्व जैसलमेर येथे कार्यरत होते. अत्यंत गरीब कुटुंबाला परमेश्वर हेच एकमेव आधार होते. परमेश्वर यांच्या पश्चात पत्नी दमावंती, दीड वर्षांची मुलगी विद्या, आई, वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे.

इतर बातम्या - दिल्ली, यूपीनंतर मुंबईतूनही निषेध सुरू, TISSमध्ये विद्यार्थ्यांकडून बहिष्कार

मंगळवारी (19 नोव्हेंबर) सांयकाळी 6 ते 7 च्या दरम्यान परमेश्वर यांचे कुटुंबीयांशी बोलणे झाले होते. ते शेवटचे ठरल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. यानंतरच युद्धाभ्यासादरम्यान त्याला वीरमरण आले तर एक जवान जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे घागरवाडा गावासह संपूर्ण बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली.

भावाचे स्वप्न पूर्ण करणार...

शहीद परमेश्वर यांचा धाकटा भाऊ विक्रम देखील सैन्यात जाण्याची तयारी करत आहे. विक्रमने लेखी परीक्षेत यश मिळवले आहे. रत्नागिरी येथे नुकतीच त्याची शारिरीक चाचणी पूर्ण झाली आहे. भावाचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची भावना विक्रम याने व्यक्त केली.

इतर बातम्या - CAA Protest: जामिया, AMUमध्ये हिंसाचारानंतर तणाव; या शहरांत प्रवेश बंद

Published by: Renuka Dhaybar
First published: December 16, 2019, 12:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading