कोल्हापुरात पुन्हा मुसळधार! जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली, स्थानिकांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापुरात पावसाचा जोर आजही कायम आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी 38.5 फुटांवर पोहोचली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 09:24 AM IST

कोल्हापुरात पुन्हा मुसळधार! जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली, स्थानिकांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर, 8 सप्टेंबर : कोल्हापुरात पावसाचा जोर आजही कायम आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी  38.5 फुटांवर पोहोचली आहे. तर राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 11,396 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच स्थानिकांनी योग्य वेळी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेल्यानं 20 मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या येथे तैनातदेखील करण्यात आल्या आहेत.

(वाचा :कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, शेतातच घेतला गळफास)

गडचिरोली : नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली जिल्ह्यात काही भागात मुसळधार पाऊस असल्यानं तिस-या दिवशीही पूरपरिस्थिती कायम आहे. पर्लकोटा आणि पामुलगौतम नद्यांना पूर आल्याने भामरागड गावात पुराचे पाणी शिरलं आहे. 70 टक्के भामरागड गाव पाण्याखाली गेलं आहे. वीज मोबाइलसेवाही पूर्णतः ठप्प आहे. भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलेलाच आहे. या परिसरातची शनिवारी जिल्हाधिकारी शेखरसिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हेलिकॅप्टरने हवाई पाहणी केली. पाच तालुक्यांचा गडचिरोली आणि चंद्रपूरशी संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

(वाचा :डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे संतापले हृदयनाथ मंगेशकर, सरकारकडे केली 'ही' विनंती)

Loading...

पालघर : धामणी धरण 100 टक्के भरलं

पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला असून डहाणू, कासा, तलासरी, जव्हार  भागात जोरदार पाऊस सुरू आहे. सूर्या नदीवरील धामणी धरण 100% भरले आहेत. पाचपैकी 3 दरवाजे 1 फुटाने उघडण्यात आले आहेत. या धरणातून 3400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशरा देण्यात आला आहे पाऊस असाच सुरु राहिला तर आनखी दरवाजे उघड न्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे या धरणातून वसई - विरार महानगरपालिकेला तसेच पालघर जिल्हाला पाणी पुरवठा केला जातो.

(वाचा : विदर्भात शेतात कीटकनाशकांची फवारणी करताना दोन शेतकऱ्यांचा मृत्यू)

VIDEO: पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्यांचा बाळासाहेब थोरातांनी घेतला समाचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 09:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...