मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्र्रात या जिल्ह्याने जाहीर केला कडकडीत लॉकडाऊन, 7 दिवस सर्व सेवा बंद

महाराष्ट्र्रात या जिल्ह्याने जाहीर केला कडकडीत लॉकडाऊन, 7 दिवस सर्व सेवा बंद

जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये या महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये या महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये या महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

    कोल्हापूर, 17 जुलै : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्यानं 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशात पुण्यानंतर आता कोल्हापूरमध्येही पुन्हा लोकडाऊन असणार आहे. सोमवारपासून सात दिवसांचा लॉकडाऊन कोल्हापूरमध्ये जाहीर करण्यात आला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. सर्व नागरिकांनी या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाला सहकार्य करण्याचं अवाहन यावेळी सतेज पाटील यांनी केलं आहे. तर औषध आणि दूध पुरवठा एवढ्यालाचा सवलत दिली जाईल इतर सर्व गोष्टी बंद असणार आहे. जिल्ह्यामध्ये सर्व सेवा शंभर टक्के बंद असणार असल्याचं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयात केला बदल, राजकीय वर्तुळात खळबळ मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये या महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या 640 कोरोना रुग्ण असून कोल्हापुरात 10 दिवसांच्या लोकडाऊनची शक्यता असणार आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोल्हापूरमधील लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रेषित मोहम्मदांच्या सिनेमा बंदीवर प्रकाश आंबेडकर मुख्यंत्र्यांना भेटले महाराष्ट्रात कुठल्या भागात आहे कडक लॉकडाऊन? लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागात कोरोनाचा वेगाने फैलाव सुरू झाला. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांपासून जिथं आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला नव्हता अशा ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे अधिक कोरोना रूग्ण असलेल्या मुंबईसह एमएमआर परिसरात तसंच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक,धुळे,जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात अधिक निर्बंध असणार आहेत.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या