कर्नाटकमध्ये महाराष्ट्रापेक्षा 9 रुपयांनी पेट्रोल स्वस्त !

कर्नाटकमध्ये महाराष्ट्रापेक्षा 9 रुपयांनी पेट्रोल स्वस्त !

कोल्हापूरसह चंदगड, सांगली भागातल्या पेट्रोलपंपांवर सध्या शुकशुकाट पहायला मिळतोय.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

07 जुलै : महाराष्ट्र कर्नाटक वाद आपल्या सर्वांनाच परिचित आहे. पण याच 2 राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये तब्बल 9 रुपयांची तफावत निर्माण झाल्यानं सीमाभागातल्या पेट्रोलपंप चालकांवर वाईट परिस्थिती उदभवलीय. त्यामळे कोल्हापूरसह चंदगड, सांगली भागातल्या पेट्रोलपंपांवर सध्या शुकशुकाट पहायला मिळतोय.

महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने सरचार्ज लागू केला. त्यामुळे पेट्रोलचे दर वाढले परिणामी जीएसटी लागू झाल्यावर कर्नाटक राज्यातले दर मात्र उतरलेत. त्यामुळे अनेक वाहनधारक हे कर्टनाक राज्यातल्याचं पेट्रोलपंपांवर पेट्रोल भरताहेत. मुंबई बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूरसह बेळगावमधून जातो. तसंच सांगली कोकणची वाहतूकही याच मार्गावरुन होत असते. त्यामुळे लाखो वाहनं या भागात दररोज प्रवास करतात. पण महाराष्ट्रात पेट्रोल हे 73 रुपये 58 पैशांनी दिलं जातं आणि कर्नाटकमध्ये हेच पेट्रोल 64 रुपये 92 पैसे लिटर या दरानं मिळतंय. त्यामुळे ही तफावत वाहनधारकांना चांगलीच फायद्याची ठरत चाललीय हे नक्की..

 किती फरक आहे दोन्ही राज्यांमध्ये ?

तारीख                महाराष्ट्र                    कर्नाटक

30 जून        पेट्रोल - 73.85             पेट्रोल - 66.96

                    डिझेल - 57.99              डिझेल - 57.58

---------------------------------------------------------------------------------------

1 जुलै           पेट्रोल - 73.58              पेट्रोल  - 64.92

                    डिझेल - 57.80            डिझेल - 54.79

First published: July 7, 2017, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading