Home /News /maharashtra /

VIDEO: कन्नडिगांचं महाराष्ट्राच्या हद्दीत अतिक्रमण, सीमेवर तणाव

VIDEO: कन्नडिगांचं महाराष्ट्राच्या हद्दीत अतिक्रमण, सीमेवर तणाव

Maharshtra Karnataka border dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावाद असताना आता कन्नडिगांनी राज्याच्या हद्दीत अतिक्रमण केलं आहे.

  बालाजी निरफळ, प्रतिनिधी उस्मानाबाद, 27 जून: महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka)मध्ये सीमावाद (border dispute) सुरू असताना आता कन्नडिगांनी महाराष्ट्राच्या हद्दीत अतिक्रमण केल्याचं समोर आलं आहे. कन्नडिगांनी अतिक्रमण केल्याने सीमा भागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्नाटक पोलिसांनी आपले तपासणी नाके (check post) हे महाराष्ट्राच्या हद्दीत उभारल्याने याला उस्मानाबादमधील शिवसैनिकांनी (Shiv Sena oppose Karnataka check post) तीव्र विरोध केला. कर्नाटकचे सीमा तपासणी नाके हे महाराष्ट्राच्या हद्दीत उभारल्याची माहिती मिळताच या सीमा तपासणी नाक्याला उमरगा तालुक्यातील कसगी गावाीतल ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी विरोध केला. कसगी गावातील गावकरी व शिवसैनिक तपासणी नाके काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मिळातच उमरगा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
  'मला रोज धमक्यांचे फोन येत आहेत', विजय वडेट्टवारांच्या विधानाने एकच खळबळ या संपूर्ण प्रकऱणावरुन सीमेवर पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. कर्नाटकचे महसूल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कसगीतील ग्रामस्थ आणि शिवसैनिक तसेच उस्मानाबाद पोलीस महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांची एकमेकांसोबत चर्चा झाली. यानंतर दोन्ही राज्यांच्या सीमा मोजून पुढील कार्यवाही करण्याचं ठरलं असून आता पुढे काय होतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमे बाबत वाद पुन्हा उफाळून आला आहे. यात नेमका तोडगा काय काढता येईल यावर चर्चा सुरू असली तरी कसगी ग्रामस्थ आणि शिवसैनिक हे सीमा तपासणी नाके हटवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. या संदर्भात कसगी ग्रामपंचायतीने उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनाही लेखी अर्ज करुन यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Karnataka, Maharashtra, Osmanabad

  पुढील बातम्या