जुन्नर, 30 जून : तहानलेल्या सहयाद्रीला 2 दिवसांपासून मुंबईच्या मान्सूनने सिंचन करायला सुरुवात केली आणि माळशेज पट्यातील नाणेघाट, जीवधन तृप्त झाला. वर्षभर निसर्गाच्या विविध छटा दाखवणारा या सगळा परिसरात पहिला पाऊस सुरू झालाय आणि यामधून आता छोटे छोटे धबधबे ओसंडून वाहायला लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यातला हा पहिला-वहिला नजारा आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे जुन्नर निसर्ग पर्यटन वेब पेज संस्थापक आज माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी...थेट नानेघाट -जीवधन परिसरातून या बद्दल सांगतायत पाहुयात हा सगळा नजारा आजच्या मान्सून स्पेशल इमेज ऑफ द डे मध्ये