मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जातीवादामुळे महाराष्ट्र विकासात मागे पडतोय; भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचं वक्तव्य

जातीवादामुळे महाराष्ट्र विकासात मागे पडतोय; भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचं वक्तव्य

भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचं वक्तव्य

भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचं वक्तव्य

गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी जळगावात मोठं वक्तव्य केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

जळगाव, 19 मार्च : मागच्या वर्षी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीवाद उदयास आला, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. आता भाजप गुजरात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी जातीवादावर धक्कादायक विधान केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील सावदा या ठिकाणी एका खाजगी कार्यक्रमात पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. यात महाराष्ट्राच्या विकासाचा संबंध जातीवादाशी लावण्यात आला आहे.

काय म्हणाले सी आर पाटील?

विकासात महाराष्ट्र हळूहळू मागे का पडत आहे. भाजप सरकार पूर्ण बहूमताने का येत नाही, यावर गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद आहे. या जातीवादामुळे महाराष्ट्राचा विकास होत नाही, असं धक्कादायक विधान सी आर पाटील यांनी केलं आहे. भाजपाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सीआर पाटील रावेर तालुक्यातील सावदा येथे एका खाजगी कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

वाचा - 'आता निवडणुका घ्याच, तुमच्या आणि माझ्या संघर्षाला...', पंकजा मुंडेंचं आव्हान

कोण आहेत सीआर पाटील?

गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत रघुनाथ पाटील म्हणजे सी. आर. पाटील यांना दिले होते. सी. आर. पाटील मूळचे जळगावचे. पण, वडील गुजरातमध्ये स्थलांतरित झाले, पाटील यांच्या राजकीय प्रवासही तिथूनच सुरू झाला. पण, त्याआधी ते पोलीस सेवेत होते. सूरतमध्ये पोलीस कॉन्स्टेबल असताना त्यांनी पोलिसांची संघटना तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ते निलंबित झाले. त्यांच्यावर दोनदा निलंबनाची कारवाई झाली होती. दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये अवैध दारुविक्रेत्यांशी पाटील यांचे लागेबांधे असल्याचा संशयावरून सूरतच्या पोलीस कृती दलाने त्यांना अटक केली होती. त्यांच्यावर 6 वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली गेली. पाटील यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला, ते सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय झाले. पुढे त्यांचा परिचय नरेंद्र मोदींशी झाला.

गुजरातमध्ये भाजप 156 जागांच्या पुढे आहे. आजवरचे हे ऐतिहासिक बहुमत भाजपाला गुजरातमध्ये मिळाले आहे. याचं श्रेय हे सीआर पाटील यांनाच जाते.

First published:

Tags: BJP, Gujrat, Jalgaon