फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने गुंडाळला बासनात

फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने गुंडाळला बासनात

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय बासनात गुंडाळला आहे.

  • Share this:

मुंबई,26 फेब्रुवारी: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय बासनात गुंडाळला आहे. फडणवीस सरकारने सुरु केलेले महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद केल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषेदत केली.

शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार विलास पोतणीस यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा मांडला होता. या मंडळांचा अभ्यासक्रम नेमका कसा आहे, याचे तज्ज्ञ कोण आहेत याबबात कोणतीही पारदर्शकता पाळला गेली नाही, असा आक्षेप आमदार पोतणीस यांनी घेतला होता.

भाजपला धक्का, फडणवीसांचे निकटवर्तीय खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर - सूत्र

राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना देवेंद्र फडणवीस सरकारने केली होती. राज्यातील सुमारे 83 शाळांनी या शिक्षण मंडळाची मान्यता मिळवून त्यांचे अभ्यासक्रम सुरु केले होते. शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये राज्यातील 13 जिल्हा परिषद शाळांना या मंडळाशी अस्थायी मान्यता देण्यात आली होती. शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये या मंडळाशी संलग्न होऊ पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित अशा 70 शाळांची निवडही करण्यात आली होती. पण याबद्दल मंडळाचं कोणतंही नियोजन नसणे, अभ्यासक्रम निश्चित न होणं यावर आजच्या लक्षवेधीत आक्षेप घेण्यात आला होता.

रविवारपासून अमित शहा कुठे होते? दिल्लीतल्या हिंसाचारावरून सोनियांचा हल्लाबोल

याबद्दल आधी आढावा घेऊनच निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली. तर विशिष्ट विचारसरणीशी संबंधित या मंडळाचा अभ्यासक्रम असल्याने हे मंडळ बंद करण्याची मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली.या विषयावर सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप काही काळ सुरू राहिले, गोंधळ कायम राहिला. अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हे मंडळ बरखास्त करत फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे.

First published: February 26, 2020, 2:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading