मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /HSC Result 2021: एकूण 6542 शाळांचा निकाल 100%, तर 46 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी!

HSC Result 2021: एकूण 6542 शाळांचा निकाल 100%, तर 46 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी!

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना ज्या दिवसाची प्रतीक्षा होती अखेर तो दिवस उजाडला आहे. बारावीचा निकाल आज जाहीर (Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education MSBSHSE) झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 03 ऑगस्ट: राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना ज्या दिवसाची प्रतीक्षा होती अखेर तो दिवस उजाडला आहे. बारावीचा निकाल आज जाहीर (Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education MSBSHSE) झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th exams) राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी बारावीचा  निकाल (Maharashtra 12th Result) आज 03 ऑगस्टला जाहीर होण्याची घोषणा केली होती. अखेर बारावीचा निकाल जाहीर (HSC Result 2021) करण्यात आला आहे. त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. दरम्यान 13 लाख विद्यार्थ्यांपैकी 99.63% विद्यार्थी पास झाले आहेत.

दरम्यान 6542 शाळांनी 100% निकाल प्राप्त केला आहे किंवा या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. Maharashtra HSC Results 2021 मध्ये 46 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी अर्थात 100 टक्के गुण मिळवले आहेत. या देखील वर्षी कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागात सर्वाधित 99.81% टक्के विद्यार्थी पास झाले आहेत तर सर्वात कमी विद्यार्थी औरंगाबाद विभागात- 99.73% पास झाले आहेत.

हे वाचा-Maharashtra 12th result: बारावीचा निकाल जाहीर; थोड्याच वेळात इथे दिसतील गुण

यंदा राज्यातील एकूण 13 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली. या विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात करण्यात आली होती.  यंदा विज्ञान शाखेचा 99.55 टक्के निकाल लागला आहे. कला शाखेचा 99.83 टक्के तर वाणिज्य  शाखेचा 99 .91 तयेक निकाल लागला आहे.

First published:

Tags: Exam result, HSC, Maharashtra