Maharashtra HSC Board Exam 2020 : आजपासून बारावीची परीक्षा, पहिला आहे Englishचा पेपर

Maharashtra HSC Board Exam 2020 : आजपासून बारावीची परीक्षा, पहिला आहे Englishचा पेपर

  • Share this:

मुंबई, 18 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. राज्यातील 12 लाख 5 हजार 27  विविध विषयांचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 18 फेब्रुवारी ते 23 मार्चपर्यंत असणार आहे. विज्ञान, वाणिज्य, कला आणि एमसीव्हीसी विभागाचे विद्यार्थी परीक्षेत सहभागी होणार आहेत. त्यापैकी 3 लाख 39 हजार विद्यार्थी हे मुंबईसह उपनगरांमधील आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी 500 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या कालावधीत मुंबईमध्ये रांगेशिवाय विद्यार्थ्यांना तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विद्यार्थ्यांसाठी ज्यादा बस सोडण्याची सुविधा एसटी महामंडळातर्फे करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधून बारावी आणि दहावीच्या परीक्षेला 3 लाखहून अधिक विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी विशेष सुविधा राबवण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाईल, खाण्याच्या गोष्टी रायटींग पॅड इत्यादी गोष्टी नेण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांकडे कॉपी अथवा तत्सम गोष्टी आढळल्यास कारवाई करणार असल्याच्या पूर्व सूचना महविद्यालयांमध्ये देण्यात आल्या आहेत. यासोबत विद्यार्थ्यांना आपलं हॉल तिकीट आणि कॉलेजचं आयडी कार्ड सोबत ठेवणं बंधनकारक आहे.

यासोबत परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि भरारी पथक नेमण्यात आलं आहे. हे भरारी पथक परीक्षा केंद्रावर त्या कालावधीमध्ये चेकिंग करणार आहेत.

हेही वाचा-Board Exam : परीक्षेला बसल्यानंतर तुम्हाला काहीच आठवलं नाही तर काय कराल?

परीक्षा केंद्रावर जाण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात

परीक्षा केंद्र- आपलं परीक्षा केंद्र कोणतं आहे, वर्ग क्रमांक कोणता आहे आणि कोणता पेपर आज आहे या सगळ्याची तपासणी करणं आवश्यक आहे. एकाच दिवशी अनेक विषयांचे पेपर असल्यानं अनेकदा गोंधळ होतो. अशावेळी परीक्षा गृहात जाण्याआधी 15 मिनिटं परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचून या सर्व गोष्टी तपासणं आवश्यक आहे. जर परीक्षा केंद्रावर काही आपल्या आसन क्रमांकाची गडबड असेल तर तातडीनं शिक्षकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे.

वेळ- परीक्षेत सर्वात महत्त्वाची असते ती वेळ. बऱ्याचदा परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचल्यानं पेपर राहिला किंवा पेपरला बसू दिलं नाही अशा तक्रारी समोर येतात. यासाठी पूर्व नियोजन करून वेळेआधी 15 ते 20 मिनिटं लवकर परीक्षा केंद्रावर पोहोचावं. जर आपला पेपर 10 वाजता असेल तर आपण 9.40 पर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे.

या गोष्टी परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई- खाण्याचा वस्तू, कॉपी, मोबाईल, मेटलचं सामान, रायटिंग पॅड, चेन इत्यादी गोष्टी परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे. या वस्तू आढळल्यास जप्त केल्या जाणार असल्याची पूर्वसूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.

हेही वाचा-Board Exam : केलेला अभ्यास लक्षात राहात नाही? मग करून पाहा 7 गोष्टी

First published: February 18, 2020, 10:07 AM IST

ताज्या बातम्या