मुंबई, 24 नोव्हेंबर: देशभरात कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट येणार अशी भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे जनता चांगलीच भयभीत झाली आहे. त्यात महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ( Maharashtra Lockdown) लागणार का? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मोठा खुलासा केला आहे. लॉकडाऊन संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळानं मोठा निर्णय घेतल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. तो निर्णय म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्यात आली आहे.
हेही वाचा...कोरोना विषाणूचे Super Spreaders सापडले! चोंदलेलं नाक आणि दातांशी आहे संबंध
मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाबाबत आढावा घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. ते म्हणाले, सध्या आपण सेफ झोनमध्ये आहोत. महाराष्ट्रात समाधानकारक परिस्थिती आहे. जगाच्या तुलनेत भारताची स्थिती चांगलीच आहे. तरी देखील लोकांमध्ये पुन्हा जनजागृतीची गरज असल्याचं राजे टोपे यांनी यावेळी सांगितलं.
कोरोना लस कधी येईल, याची खात्री नाही. मात्र, टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
आणखी काय म्हणाले आरोग्यमंत्री?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत आजची कोरोना परिस्तितीवर चर्चा झाली. देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती उत्तम आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आता टार्गेट देण्यात येत आहे. पर मिलियन टेस्ट वाढवल्या पाहिजेत. या संदर्भात अधिसूचना देखील आजच काढण्यात येणार आहे. राज्यात टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. RTPCR टेस्ट 75 टक्के असल्या पाहिजे, असंही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
लसीकरण संदर्भात सखोल चर्चा झाली. देशात 5 व्हॅक्सिन तयार होत आहेत. देशात 30 कोटी लोकांना प्राधान्याने लस द्यायची आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
काही व्हॅक्सिनचे 2 डोस तर काहींचे 3 डोस द्यावे लागणार आहे. परीणाम आणि कालावधी हा महत्त्वाचा भाग असणार आहे, असंही ते म्हणाले. काही व्हॅक्सिन उणे 20 डिग्रीमध्ये ठेवाव्या लागणार आहेत. लसीकरण कार्यक्रम पूर्णपणे केंद्र सरकार राबवणार आहे.
हेही वाचा...पंतप्रधानांसोबत बैठकीत मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...'लॉकडाऊन संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही...
एका साथीच्या रोगाच्या (महामारी) 3 लाट असतात. पण दुसरी आणि तिसरी लाट जेव्हा येते तेव्हा रुग्णांची संख्या शुन्य (0) होते. पण देशात सध्या कुठेच कोरोना रुग्णांची संख्या शुन्यावर आलेली नाही. जनतेला आवाहन आहे की, SOP काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. गुजरातमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या, आणि आता त्या बंद कराव्या लागल्या. त्यामुळे तशी परीस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ नये, यासाठी काही सुरक्षा निर्बंध घातले जाऊ शकतात. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स बनवण्यात आली आहे.
लसीकरणाबाबत हीच टास्क फोर्स अंमलबजावणी करणार आहे. सध्या आपण टेस्टिंग रेश्योमध्ये 77 हजारांपर्यंत आहे. ती संख्या वाढवून दीड लाखापर्यंत आपल्याला न्यायची आहे, असही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.