Home /News /maharashtra /

Rajesh Tope : शाळा सुरु होताहेत, पालकांनो हे नक्की वाचा! राजेश टोपे यांचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा

Rajesh Tope : शाळा सुरु होताहेत, पालकांनो हे नक्की वाचा! राजेश टोपे यांचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा

Rajesh Tope on School Reopen : "जगातला सगळा अभ्यास केल्यानंतर आम्ही शाळा सुरु करण्याचा हा निर्णय घेतला आहे. युरोप खंडात कोरोनाची तिसरी-चौथी लाट आहे. पण सगळ्यांनी शाळा सुरु केलेल्या आहेत", असं राजेश टोपे म्हणाले.

    23 जानेवारी, जालना : राज्यभरात सोमवारपासून (24 जानेवारी) बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळा सुरु होत (Maharashtra School Reopen) आहेत. राज्यात मुंबई वगळता अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या (Maharashtra Corona) दररोज वाढताना दिसत आहे. त्यामुळे पालकांमध्ये काहीशी धाकधूक आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने (Maharashtra Government) काही दिवसांपूर्वीच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबई-दिल्लीत कोरोना रुग्णांच्या नव्या आकडेवारीकडे बघून सरकारने पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता मुंबई-दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) ओसरताना दिसत असल्याने राज्य सरकारने पुन्हा राज्यात शाळा सुरु करण्याचा (School Reopen) निर्णय घेतला. राज्यात उद्यापासून शाळा सुरु होत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सर्व पालकांना मुलांना शाळेत पाठवण्याची विनंती केली आहे. जगभरातील शाळांचा अभ्यास केल्यानंतरच सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. '...म्हणून आम्ही शाळा सुरु करण्याची रिस्क घेतली' "सर्वच शाळा सुरु कराव्यात अशाच सुचना आहेत. पण ज्या जिलह्यांमध्ये अतिशय जास्त पॉझिटिव्ही रेट असेल त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, असं ठरविण्यात आलं आहे. प्रशासनाने ठरवणं योग्य राहील. शाळा सुरु झाल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. मुलांकडे अधिक बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कुणी विद्यार्थी थोडासाजरी लक्षणे असलेला आढळला तर त्याच्याकडे लक्ष ठेवून त्याची पटकन तपासणी झाली पाहिजे. एखाद्या शाळेतला मुलगा पॉझिटिव्ह आढळला तर त्या लगेचच त्या वर्गाला सुद्धा ताबोडतोब सुट्टी दिली पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली पाहिजे. कोरोना पसरण्यापासून थांबवलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना तेच करायचं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणाचं नुकसाण होऊ नये, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही गोष्टींचा मध्यबिंदू म्हणून एक गोष्ट करण्याची आपल्याला गरजेचं आहे. मुलांचं नुकसाण होऊ नये यासाठीच आम्ही मंत्रिमंडळाने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही रिस्क घेतली", असं राजेश टोपे यांनी सांगितलं. (युद्धाचे ढग! अमेरिकेनं युक्रेनमध्ये पाठवला मोठा शस्त्रसाठा, रशियाला इशारा) '...तर निर्बंध शिथिल होतील' "सर्वात महत्त्वाचं म्हणजे 90 ते 95 टक्के बेड्स हे रिकामे आहेत. आयसीयू, ऑक्सिजन बेड्स रिकामे आहेत. जवळपास 90 टक्के नागरिक होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळेच हा शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टास्क फोर्सचीदेखील संमती घेण्यात आलेली आहे. आपण बारकाईने लक्ष ठेवू. पुढेही योग्य तो निर्णय घेऊ. हे जर सगळं व्यवस्थित होत राहिलं तर हळूहळू निर्बंध शिथिल करु. रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांचं प्रमाण कमी राहिलं तर निर्बंध पुढे कमी करता येऊ शकेल", अशी माहिती त्यांनी दिली. 'मुलांचा ब्रेन विकसित करण्याचाच हा कालावधी असतो' "आम्ही आमचं काम केलेलं आहे. ज्या पालकांना मुलांना शाळेत पाठवू नये असं वाटत असेल तर माझी पालकांना नम्र विनंती आहे. जगातला सगळा अभ्यास केल्यानंतर आम्ही शाळा सुरु करण्याचा हा निर्णय घेतला आहे. युरोप खंडात कोरोनाची तिसरी-चौथी लाट आहे. पण सगळ्यांनी शाळा सुरु केलेल्या आहेत. मुलांचा ब्रेन विकसित करण्याचाच हा कालावधी असतो. त्यामुळे त्यांना सातत्याने घरी ठेवलं तर तेही योग्य नाही. मुलांच्या विकासाच्या दृष्टीकोनाने आपण शाळा सुरु केलेल्या आहेत", असं राजेश टोपे म्हणाले. (दगडफेक-लाठीचार्ज, सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी बंगालमध्ये भयानक हिंसाचार) "लसीकरण करा हा विषय केंद्र सरकारने वारंवार सांगितलेला आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा लसीकरणामध्ये कुठेही मागे नाही आहोत. पहिली लस ही 90 टक्क्याच्या पुढे गेली आहे. तर दुसरी लस घेण्याचं प्रमाण हे 62-63 टक्क्यांच्या पुढे गेलेलं आहे. जे नागरिक दुसरा डोस घेत नसतील तर ते चूक करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना वारंवार लसीकरणाची विनंती करतोय. आमची सक्ती नाही, पण भाग पाडू. लसीकरणाचं महत्त्व त्यांना पटवून देऊ", असंदेखील राजेश टोपे म्हणाले,
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या