मुंबई, 24 मार्च: राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून ती 101 वर पोहोचली आहे. मंगळवारी पुण्यात 3 तर साताऱ्यात एक रुग्ण आढळून आला. तर मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. कोरोनाचे रुग्ण बरे होतायेत ही समाधानाची बाब आहे. कोरोनाचे दोन रुग्ण आईसीयूत असून इतरांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, पुणे, मुंबईतील नागरिकांकडे संशयानं बघू नका. गावात येण्यापासून आपल्या लोकांना अडवू नये, OPD बंद करन योग्य नाही.
हेही वाचा... कोरोनाचा कहर: वृद्धांना सोडलं देवाच्या भरवश्यावर, वृद्धाश्रमात सापडले 19 मृतदेह
दरम्यान, कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील प्रभाव वाढत चालला असून कोरोनाबाधितांची संख्या 101 वर पोहोचली आहे. अशातच मुंबईत आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेला 65 वर्षीय व्यक्ती नुकताच युएई येथून मुंबईत आला होता. या व्यक्तीला ताप, खोकला आणि श्वसनासाठी त्रास होत असल्याने 23 मार्च रोजी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
हेही वाचा... सांगलीत सापडलेल्या 'त्या' चार कोरोना बाधितांच्या 7 नातेवाईकांना रुग्णालयात केलं
मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाचा हा तिसरा बळी आहे. सदरच्या रुग्णाला मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचाही त्रास होत होता. जेव्हा त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर काल संध्याकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, भारतामध्ये एकीकडे 37 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन आज घरी जाणार आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. कालपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 97 होती पण आता कोरोनाचे आणखी 4 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. पुण्यात 3 तर साताऱ्यामध्ये कोरोनाचा 1 असे चार नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 101 झाली आहे.
हेही वाचा...कर्फ्यूदरम्यान वृद्धांसाठी झटतेय ही तरुणी, सायकलवर फिरणारी तारणहार
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 101 वर पोहोचल्यानं भीती आणि चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कर्फ्यू लागू केला आहे. जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार पसरला आहे. 15 हजारहून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हा व्हायरस आता वेगानं पसरत असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी पंजाबमध्ये सर्वात पहिल्यांदा कर्फ्यू लावण्यात आला होता. महाराष्ट्रातील वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही कर्फ्यू लावला आहे.