गारपिटीमुळं उभी पिकं झोपली, राज्यभरात 5 जणांचा मृत्यू

गारपिटीमुळं उभी पिकं झोपली, राज्यभरात 5 जणांचा मृत्यू

सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता अस्मानी संकटाचाही समना करावा लागणार आहे.

  • Share this:

12 फेब्रुवारी : विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीनं काल झोडपून काढलं. त्यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी आता पिकाच्या नुकसानीमुळं पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता अस्मानी संकटाचाही समना करावा लागणार आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जालना तालुक्यात नामदेव शिंदे, जाफराबाद तालुक्यात आसाराम जगताप आणि वाशिम जिल्ह्यात यमुनाबाई हुंबड या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर दर्यापूर तालुक्यात गंगाधर कोकाटे यांचा वीज पडून मृत्यू झाला.

या गारपीटीमुळं रब्बी पीकाचं प्रचंड नुकसान झालं. गहू, हरबरा आणि संत्र्याला याचा फटका बसला. बोंड आळीमुळं शेतकऱ्यांच्या हातातून कापूस गेला होता. तर डाळी आणि इतर पीक चांगलं येवूनही त्याला चांगला भाव मिळाला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं होतं. त्यात कर्जमाफी मिळूनही त्याचा घोळ घातला गेल्यानं शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

बीड जिल्ह्यातील परळी, गेवराई,मजलगाव आणि बीड तालुक्यात काही ठिकाणी रात्री आणि पहाटे झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीने कोट्यावधी रुपयांचं मोठे नुकसान झालं आहे. ज्वारी, गहू, हरभरा या पीकांसह भाजीपाला, आंबा, द्राक्ष या फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे.

अकोल्यातही झालेल्या गारपिटीत तेल्हारा, अकोट आणि बाळापूर तालुक्यात सर्वात जास्त नुकसान झालं आहे. यात गहू , हरभरा, भाजीपाला, फळबागांना फटका बसला आहे. हातातोंडांशी आलेलं पिक गारपीटीनं उद्वस्थ केल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.

विशेष म्हणजे सध्या पिक काढणीचे दिवस असून गहू, ज्वारी, हरभरा सोंगणे आणि मळणी यंत्रातून काढणीचे दिवस आहेत आणि अशातच बळीराजावर अवकाळी पावसाचे संकट कोसळले. परिणामी हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून जात असल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. दरम्यान काल सकाळी झालेल्या गारपिटीमुळे वित्त हानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे अस्मानी संकटापासून शेतकऱ्यांना कोण वाचवणार? त्यांना नुकसान भरपाई मिळणार का? याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

First published: February 12, 2018, 8:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading