कोल्हापूर, 18 जानेवारी : कोल्हापूर जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतीचा निकाल आज जाहीर होत आहे. जिल्ह्यातील 12 ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. करवीर तालुक्याच्या 49 गावांसाठी कसबा बावडा इथल्या रमणमळा शासकीय गोदामात मतमोजणी होत आहे. एकूण सहा फेऱ्यांमध्ये 36 टेबलवर मतमोजणी होणार आहे.
कोल्हापूरमधील खानापूर गावच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना धक्का बसला आहे. कारण पाटील यांच्या खानापूरमध्ये 9 जागांपैकी पहिल्या 6 जागा शिवसेनेने जिंकल्या, तर 3 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.. खानापूरमध्ये शिवसेनेविरोधात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी आघाडी केली असतानाही शिवसेनेनं विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपसाठी ही नामुष्की मानली जात आहे.
कोल्हापुरात काय आहे चित्र?
कागलच्या सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा
भाजपची सत्ता उलटवून 15 पैकी 11 जागा जिंकल्या
हातकणंगले- माणगाव
स्थानिक आघाडी 13 , धर्यशील माने गट 4
जि. प नेते राजू मगदूम यांचा शिवसेनेच्या खासदारांना धक्का
गडहिंग्लज तालुका, गावाचे नाव :- मुंगुरवाडी # विजयी पक्ष-आघाडी :- भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल
मिळालेल्या जागा :- 4 # विरोधी पक्ष-आघाडी :- नवक्रांती युवा महाविकास आघाडी
मिळालेल्या जागा :- 3 सत्ताधारी काढावर पास, शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेस सत्तेत कायम...# प्रभाग 1- विरोधक वरचढ # प्रभाग 2 व 3 - सत्ताधाऱ्यांना साथ.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.