अहमदनगर, 18 जानेवारी : ग्रामपंचायत निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत मतदार कुणाच्या बाजूने उभे राहिले आहेत, हे निकालातून स्पष्ट होण्यास सुरुवात झाली असून लोणी खुर्द गावात भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात सत्तांतर झालं असून 17 पैकी 13 जागा जिंकत परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. या लोणी खुर्द गावात तब्बल 20 वर्षानंतर सत्तांतर झालं आहे. त्यामुळे या गावावर एकहाती वर्चस्व असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
अहमदनगर उत्तर विभागातील राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड, काळे , कोल्हे, मंत्री शंकरराव गडाख यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी कुणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे हळहळू स्पष्ट होऊ लागलं असून अद्याप अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचे निकाल येणे बाकी आहे.
गावातील निकालाने वाढवल्या चंद्रकांत पाटलांच्या अडचणी
कोल्हापूर जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतीचा निकाल आज जाहीर होत आहे. जिल्ह्यातील 12 ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. करवीर तालुक्याच्या 49 गावांसाठी कसबा बावडा इथल्या रमणमळा शासकीय गोदामात मतमोजणी होत आहे. एकूण सहा फेऱ्यांमध्ये 36 टेबलवर मतमोजणी होणार आहे.
कोल्हापूरमधील खानापूर गावच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना धक्का बसला आहे. कारण पाटील यांच्या खानापूरमध्ये 9 जागांपैकी पहिल्या 6 जागा शिवसेनेने जिंकल्या, तर 3 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.. खानापूरमध्ये शिवसेनेविरोधात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी आघाडी केली असतानाही शिवसेनेनं विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपसाठी ही नामुष्की मानली जात आहे.
कोल्हापुरात काय आहे चित्र?
कागलच्या सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा
भाजपची सत्ता उलटवून 15 पैकी 11 जागा जिंकल्या
हातकणंगले- माणगाव
स्थानिक आघाडी 13 , धर्यशील माने गट 4
जि. प नेते राजू मगदूम यांचा शिवसेनेच्या खासदारांना धक्का
गडहिंग्लज तालुका, गावाचे नाव :- मुंगुरवाडी # विजयी पक्ष-आघाडी :- भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल
मिळालेल्या जागा :- 4 # विरोधी पक्ष-आघाडी :- नवक्रांती युवा महाविकास आघाडी
मिळालेल्या जागा :- 3 सत्ताधारी काढावर पास, शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेस सत्तेत कायम...# प्रभाग 1- विरोधक वरचढ # प्रभाग 2 व 3 - सत्ताधाऱ्यांना साथ.
दरम्यान, राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली होती.
मदान यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. तर ज्या गावांमध्ये मतदान झालं तेथील मतमोजणी सुरू असून काही गावांचे निकालही आले आहेत, तर काही ठिकाणी अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breaking News, Gram panchayat, Radha krishna vikhe patil