मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Gram Panchayat election 2022 : अशोक चव्हाणांच्या गडाला भाजपचा सुरूंग, नांदेडमध्ये कमळ नंबर वन!

Maharashtra Gram Panchayat election 2022 : अशोक चव्हाणांच्या गडाला भाजपचा सुरूंग, नांदेडमध्ये कमळ नंबर वन!

नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. सर्वाधिक जागा जिंकून भाजपाने जिल्ह्यात आपली ताकद वाढवली आहे. भाजपाच्या या विजयामुळे अशोक चव्हाण यांच्यापुढे आव्हान उभे राहिले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nanded, India
  • Published by:  Shreyas

नांदेड, 19 सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. सर्वाधिक जागा जिंकून भाजपाने जिल्ह्यात आपली ताकद वाढवली आहे. भाजपाच्या या विजयामुळे अशोक चव्हाण यांच्यापुढे आव्हान उभे राहिले आहे.

मराठवाड्यातील नांदेड जिल्हा हा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा गड मानला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे वर्चस्व आहे, पण गेल्या काही वर्षात भाजपने नांदेड मध्ये आपली ताकद चांगलीच वाढवली. आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात एकूण 91 ग्रामपंचायतीपैकी सर्वाधिक जागा भाजपाने जिंकल्या, या निवडणुकीतून भाजपाने ग्रामीण भाग काबीज केला आहे.

काँग्रेस पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकांवर राहिला, पण काँग्रेसला हा पराभव मान्य नाही. आपलेच समर्थक बहुसंख्य ठिकाणी निवडून आल्याचा काँग्रेसचा दावा आहे. जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचे वर्चस्व कायम असल्याचे काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे.

सत्तातरानंतर ही पहिलीच निवडणूक होती, त्यात जनतेने सत्ताधाऱ्यांना पसंती दिल्याचं दिसतं आहे, पण या निवडणुकीचे निकाल काँग्रेस आणि अशोक चव्हाण यांच्यासाठी चिंता वाढवणारे आहेत.

'बारामती' जिंकायला निघालेल्या भाजपला जोरदार धक्का, पवारांच्या गडाला सुरूंग नाहीच!

आता पर्यंतचे निकाल

एकूण- 89 ग्राम पंचायत

शिवसेना - 04

शिंदे गट - 00

भाजपा - 16

काँग्रेस - 12

राष्ट्रवादी - 04

स्थानिक आघाडी - 03

First published:

Tags: Ashok chavan, BJP