Maharashtra Lockdown : शिवभोजन थाळी महिनाभर मोफत मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

Maharashtra Lockdown : शिवभोजन थाळी महिनाभर मोफत मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून एक महिनाभर रोज जवळपास 2 लाख थाळ्या शिवभोजन मोफत दिलं जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना अखेर लॉकडाऊनची  (Maharashtra Lockdown) घोषणा केली आहे. बुधवारी रात्री 8 वाजेपासून राज्यात 144 कलम लागू होणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून एक महिनाभर रोज जवळपास 2 लाख थाळ्या शिवभोजन मोफत दिलं जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना याबाबत माहिती दिली.

(वाचा - Maharashtra Lockdown updates: उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू, पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री )

बुधवारी 14 एप्रिल रोजी रात्री आठ वाजेपासून ते 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. यादरम्यान ठरवून दिलेल्या काही सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारनं लॉकडाऊन करू नये म्हणून विरोधकांनी लॉकडाऊन विरोध करताना गरिबांच्या रोजीरोटीची सरकारनं व्यवस्था लावाली असं म्हटलं होतं. तोच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित करताना माहिती दिली. कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन करावा लागत असल्यानं कदाचित रोजी मंदावणार आहे पण सर्वांना रोटी मिळेल याची काळजी राज्य सरकारनं घेतली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी मोफत धान्य आणि शिवभोजन थाळी याबाबत घोषणा केली.

(वाचा - उत्तर भारतासाठी 106 विशेष ट्रेन; राज्यातील लॉकडाउनच्या चर्चेने गर्दी वाढली)

मोफत शिवभोजन थाळी

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, गरीबांची उपासमार होऊ नये म्हणून राज्य सरकारनं पुढील एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 15 एप्रिलपासून पुढचा एक महिना दररोज जवळपास 2 लाख शिवभोजन थाळी मोफत दिल्या जाणार असल्याची घोषणा त्यांनी. सुरुवातीला 10 रुपयांची असलेली शिवभोजन थाळी सरकारनं नंतर 5 रुपयांना केली होती. त्यानंतर आता ही थाळी गरीबांना मोफत दिली जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

अन्न सुरक्षा योजना

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यातील अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी धान्य मोफत दिलं जाणार आहे. एक महिन्यासाठी 7 कोटी लाभार्थ्यांच्या कुटुंबातील प्रतिव्यक्ती 3 किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

Published by: News18 Desk
First published: April 13, 2021, 10:09 PM IST

ताज्या बातम्या