Home /News /maharashtra /

शिवसेनेचं सरकार येणार का? महाराष्ट्रात आता उरल्यात 4 शक्यता

शिवसेनेचं सरकार येणार का? महाराष्ट्रात आता उरल्यात 4 शक्यता

महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या खेळात सोमवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. बरोबर 40 वर्षांपूर्वी शरद पवार यांनी वसंतदादा पाटील सरकारमधून फुटून 'पुलोद'चा प्रयोग केला होता आणि सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते. त्याची आठवण देणारी परिस्थिती निर्माण व्हायला पुरेसा वाव आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या खेळात सोमवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपने सत्ता स्थापनेस असमर्थता दर्शवल्यानंतर आता शिवसेनेच्या हातात सत्तेची दोरी गेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या निर्णयावर आता महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतरच निर्णय घेणार अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. शिवसेनेबरोबर जाण्यास सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका वाड्रा अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात स्थापनेच्या 3 शक्यता आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेला पक्ष म्हणून भाजपला राज्यपालांनी सर्वप्रथम संधी दिली. शिवसेनेशिवाय सत्तास्थापनेस असमर्थता व्यक्त करत भाजपने संधी नाकारली. त्यानंतर आता शिवसेनेला राज्यपालांनी विचारलं आहे. शिवसेनेला आपला निर्णय संध्याकाळी 7.30 पर्यंत राज्यपालांना कळवायचा आहे. शिवसेनेपुढे आता दोन्ही काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याशिवाय गत्यंतर नाही. सेनेबरोबर वाटाघाटी सुरू होण्याअगोदरच दोन्ही काँग्रेसने दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. कोणते पर्याय आता शिवसेनेपुढे आहेत आणि महाराष्ट्रात आता काय होऊ शकतं? वाचा - मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद सावंत यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया 1. महाशिवआघाडी : तिन्ही पक्षांचं एकत्र सरकार उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. पण दोन्ही नेत्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याची ठोस माहिती नाही. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहात असल्याचं समजतं. तेव्हा काँग्रेसचा निर्णय सकारात्मक आला तर शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसह सरकार स्थापनेचा दावा करू शकते. मग मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असेल तर महत्त्वाच्या खात्यांसाठी तिन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी होऊ शकतात. 2. शिवसेनेला बाहेरून पाठिंबा सरकारमध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हायची बहुतेक काँग्रेस आमदारांची इच्छा आहे. तसं पत्रही हायकमांडकडे राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी सोपवलं आहे. पण सोनिया गांधी यावर काय निर्णय घेतात यावर सगळं अवलंबून आहे. काँग्रेसने बाहेरून पाठिंब्याचा निर्णय घेतल्यास आणि राष्ट्रवादीनेही तशी तयारी दर्शवल्यास शिवसेनेला सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होईल. पण पाठिंबा काढून घ्यायची टांगती तलवार सतत शिवसेनेवर राहील. 3. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सरकार बनवणार शिवसेना सत्तास्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ जमवण्यास असमर्थ ठरली तर खरा पेच निर्माण होईल. बरोबर 40 वर्षांपूर्वी शरद पवार यांनी वसंतदादा पाटील सरकारमधून फुटून स्वतंत्र आघाडी स्थापन केली होती. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस आघाडी सरकारमधून 40 आमदारांसह बाहेर पडून शरद पवार पहिले सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते. त्याची आठवण देणारी परिस्थिती निर्माण व्हायला पुरेसा वाव आहे. वाचा - भाजपच्या 7 आमदारांचा अजित पवारांना फोन, राजकारणात मोठी खळबळ त्या वेळी त्यांनी थेट जनता पक्षाशी (त्या निवडणुकीत जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळूनही तो पक्ष सत्तेत सगभागी नव्हता.) जवळीक साधली. जुलै 1978 मध्ये  पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग शरद पवारांनी केला आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच काँग्रेसशिवाय सरकार सत्तेत आणलं. समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. आत्ताच भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची बातमी आली आहे. त्यामुळे असं आमदार फोडाफोडीचं राजकारण झालं तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणंही सहज शक्य होईल. 4. राष्ट्रपती राजवट आणि पुन्हा निवडणुका कुठलाच पक्ष सत्तास्थापनेस किंवा सत्ता स्थापन केल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरला तर मात्र पुन्हा राज्यात निवडणुका घ्याव्या लागतील. बहुमत सिद्ध करता आलं नाही तर पुढच्या निवडणुका होईपर्यंत राष्ट्रपती राजवट येईल. -------------------------------- हे वाचा शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपचा प्लॅन तयार? संध्याकाळी भूमिका मांडणार मातोश्री ते दिल्ली सत्तासंघर्षाबाबत 'या घडी'चे सर्वात महत्त्वाचे 10 अपडेट्स पाहा VIDEO : राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काय ठरलं? नवाब मलिक म्हणाले...
    Published by:Arundhati Ranade Joshi
    First published:

    Tags: Maharashtra Assembly Election 2019, Pulod, Sharad Pawar (Politician), Shiv Sena (Political Party)

    पुढील बातम्या