Home /News /maharashtra /

कार्तिकी वारीवरही निर्बंध! पंढरपुरात संचारबंदी तर वारकऱ्यांसह दिंड्या-पालख्यांना प्रवेश बंदी

कार्तिकी वारीवरही निर्बंध! पंढरपुरात संचारबंदी तर वारकऱ्यांसह दिंड्या-पालख्यांना प्रवेश बंदी

कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांसह दिंड्या-पालख्यांना पंढरपुरात प्रवेश बंदी

पंढरपूर, 20 नोव्हेंबर: कोरोना संसर्गाचा ( Covid-19) प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. त्यात राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य विभागानं वर्तवली आहे. कोरोना संसर्गामुळे आषाढी (Aashadhi Wari)यात्रेनंतर कार्तिक वारी (Kartiki Ekadashi) ही निर्बंधातच होणार, हे स्पष्ट झालं आहे. पंढरपूरमध्ये (Pandharpur) संचारबंदी लावणे. तसेच पंढरपूर शहरात येणारी वाहतूक बंद करणे, अशा विविध विषयांचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवलेला आहे. पुढील एक ते दोन दिवसांत त्यास मंजुरी मिळून आषाढीच्या पद्धतीनेच कार्तिकी वारीवर निर्बंध असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांसह दिंड्या-पालख्यांना पंढरपुरात प्रवेश बंदी असणार आहे. हेही वाचा.. अजित पवार पुन्हा नाराज? आणखी एका महत्त्वाच्या समितीचं सोडलं अध्यक्षपद आषाढीनंतर कार्तिक वारी भरेल आणि त्यामध्ये विठुरायाचे दर्शन करता येईल, असं भाविकांना वाटत होतं. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर दर्शनास सुरू झाले होते. मात्र, आता कार्तिकी वारीच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये भाविकांना प्रवेश बंदी घालण्यात येणार हे स्पष्ट झालं आहे. सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. पंढरपूर मध्ये 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचा प्रस्ताव पोलिस विभागाने पाठविला आहे. 22 नोव्हेंबरपासून 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपुरामध्ये एसटी वाहतूक बंद असणार आहे. कार्तिकी यात्रेसाठी सतराशे अधिकारी-कर्मचारी होमगार्ड यांचा बंदोबस्त पोलिस विभागाने लावलेला आहे. तिहरी पद्धतीचा बंदोबस्त असणार आहे . कार्तिकी एकादशीसाठी आंध्र प्रदेश कर्नाटक आणि कोकण या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. सोलापूर  जिल्हा प्रशासनाने आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या प्रशासनास सुध्दा पंढरपूर कडे येणार्या भाविकांना येऊ देऊ नये, याबाबत कळवले आहे. हेही वाचा...ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, 100 युनिट वीज माफीचा शब्द पाळणार; पण... वारकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच कार्तिकी वारीच्या निमित्तानं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून आषाढी एकादशी प्रमाणेच कार्तिकी यात्रा सुध्दा प्रतिकात्मक रूपात साजरी करावी. तसेच आषाढी यात्रा पध्दतीने नियम असावे असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला आहे. भाविकांनी मात्र कार्तिकी यात्रा रद्द न करता कोविडचे नियम घालून यात्रा करावी अशी मागणी केली होती.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Pandharpur

पुढील बातम्या