काँग्रेसला चहुबाजूंनी धक्का बसत असतानाच बाळासाहेब थोरातांना दिलासा

काँग्रेसला चहुबाजूंनी धक्का बसत असतानाच बाळासाहेब थोरातांना दिलासा

राज्य सरकारनेही थोरातांच्या कामावर शिक्कामोर्तब केलं आहे.

  • Share this:

संगमनेर, 5 सप्टेंबर : राजकारणातील कुशल डावपेचांसोबत सहकार क्षेत्रातील कामाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ओळखले जातात. राज्य सरकारनेही थोरातांच्या या कामावर शिक्कामोर्तब केलं आहे. संगमनेरच्या थोरात सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाचा 'सहकारनिष्ठ' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अच्छे दिन आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. पण पक्षातील आऊटगोईंगमुळे बाळासाहेब थोरात काहीसे बॅकफूटवर गेले आहेत. या सगळ्या नकारात्मक घडामोडींनंतर सरकारने थोरात यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या कारखान्याला सहकारनिष्ठ पुरस्कार दिल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत नेते मानले जातात. राज्यातल्या सहकार चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. मराठा समाजाचे मातब्बर नेते, गांधी घराण्याचे विश्वासू अशीही त्यांची ओळख आहे. नगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग सात वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. नगरच्या विखे पाटील घराण्याचे ते कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळे विखे पाटील यांना शह देण्यासाठीही काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्याकडे नेतृत्त्व दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही थोरातांची जवळीक आहे. राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यातही त्यांची हातोटी आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदाची जबाबदारी सांभाळली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी महसूल, कृषी आणि शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी हिमाचल प्रदेशचे प्रभारी म्हणूनही काम पाहिले होते.

सहकार चळवळीत पुढाकार

बाळासाहेब थोरात यांचं सहकार चळवळीतही मोठे योगदान आहे. संगमनेरमध्ये त्यांनी सहकारी दूधसंस्था स्थापन केली. जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्षही होते. संगमनेरमध्ये शिक्षणसंस्था, दूधसंस्था, सहकारी साखर कारखाना या सगळ्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे. त्यामुळे गोरगरीब आणि जनसामान्यांमध्येही ते लोकप्रिय आहेत. या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो.

मायलेकीनी धाडस केलं अन् सोनसाखळी चोरांना शिकवला चांगलाच धडा, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 12:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading