महाविद्यालयांमध्ये 19 फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत अनिवार्य होणार, उदय सामंत यांची घोषणा

महाविद्यालयांमध्ये 19 फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत अनिवार्य होणार, उदय सामंत यांची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजे 19 फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी केली आहे.

  • Share this:

पुणे, 12 फेब्रुवारी : राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत गायन अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजे 19 फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी केली आहे.

उदय सामंत यांनी आज पुण्यात शिक्षणसंस्था चालकांची आढावा बैठक घेतली. यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील रिक्त जागा भरण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करता येतील, याबाबतचा आढावा घेण्यात आला. यासाठी शिक्षणसंस्था चालकांचीच एक पाच सदस्यीस समिती नियुक्त केली जाणार आहे. यासोबतच सीएए आंदोलनांना परवागनी देताना महाविद्यालयांनी विद्यार्थी संघटनांशी भेदभाव करू नये, असं आवाहनही सामंत यांनी केलं.

दरम्यान, याआधी केंद्र सरकारने चित्रपट गृहांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर चित्रपटगृहात राष्ट्रगीत बंधनकारक नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य करण्याबाबतची आपली भूमिका केंद्र सरकारने  बदलली होती. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवणं बंधनकारक केल्याच्या नियमात बदल करण्याची आपली तयारी असल्याचं केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला सांगितलं होतं.

First published: February 12, 2020, 5:15 PM IST

ताज्या बातम्या