मोठी बातमी! Remdesivir साठी राज्य सरकारचे प्रयत्न, आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांत दिली जाहिरात

मोठी बातमी! Remdesivir साठी राज्य सरकारचे प्रयत्न, आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांत दिली जाहिरात

ऑक्सिजनसाठी विविध राज्यांशी संपर्क सरकार करत आहे. तर रेमडेसिव्हीरसाठी आता राज्य सरकारनं थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन (Oxygen) आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन (Remdesivir Injection) यांचा पुरेसा साठा गरजेचा आहे. त्यामुळं राज्य सरकारनं आता या दोन्हीसाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. ऑक्सिजनसाठी विविध राज्यांशी संपर्क सरकार करत आहे. तर रेमडेसिव्हीरसाठी आता राज्य सरकारनं थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत गरजेच्या ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी नातेवाईक जास्तीचे पैसे मोजूनही ते विकत घेतायत. यातून रेमडेसिविरचा काळाबाजरही मोठ्या प्रमाणावर झाला. पण मुळात पुरवठा किंवा उत्पादनच कमी असल्यानं सरकारला हवे तेवढे इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळं रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. हेच हाल थांबवण्यासाठी आता राज्य सरकारनं देशात इंजेक्शन उपलब्ध होत नसतील तर इतर देशांतून म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून हे इंजेक्शन मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

(हे वाचा-Oxygen tanker missing: कोरोना महामारीत नवं संकट; ऑक्सिजन टँकरच रस्त्यातून गायब)

राज्य सरकारने काही देशांच्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये यासंदर्भात जाहिराती दिल्याची माहिती मिळाली आहे. म्हणजे या द्वारे सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावरील रेमडेसिव्हीर उत्पादकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे सरकारच्या प्रयत्नांना यश येतानाही दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे काही देशांनी सरकारशी संपर्क साधत इंजेक्शनचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे. सिंगापूर, बांग्लादेश, इजिप्त अशा काही देशांनी राज्याला रेमडेसिव्हीर इंजेक्शन पुरवण्यासाठी प्राथमिक तयारी दाखवली आहे. त्यामुळं या परदेशी उत्पादकांकडून रेमडेसिव्हीरची खरेदी करता येते का यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत.

(हे वाचा -कोरोनाविरोधी लढ्यात भारताला मोठं यश! लशीनंतर औषधही तयार; चाचणीचा एक टप्पा यशस्वी)

रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आले होते. राज्याला आवश्यक असलेल्या प्रमाणात इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याची तक्रार राज्यानं वारंवार केली होती. त्यानंतर निर्यातीशिवाय पडून असलेल्या इंजेक्शन मिळवण्यावरूनही वाद झाला. इंजेक्शनच्या पुरवठ्यावर केंद्र सरकारचं नियंत्रण असल्यानं दोन्ही राज्य आणि केंद्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पण आता रुग्णांसाठी इतर मार्गाने इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असून, आता इतर देशांमधील कंपन्यांकडून सरकार ते खरेदी करण्याचा प्रयत्न करतंय. त्याला यशही येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Published by: News18 Desk
First published: April 23, 2021, 4:37 PM IST

ताज्या बातम्या