मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर 5 दिवसांनी सरकारने काढला तूरखरेदीचा जीआर

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर 5 दिवसांनी सरकारने काढला तूरखरेदीचा जीआर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 एप्रिलपर्यंत नाफेड केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करणारच अशी घोषणा केली होती.

  • Share this:

27 एप्रिल : तूरबंदीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मलमपट्टी केली खरी पण राज्य सरकारकडून यांची अंमलबजावणी करण्यासाठी तब्बल 5 दिवस लागले. 5 दिवसांनंतर  तूर खरेदी संदर्भातला जीआर अखेर जारी करण्यात आलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 एप्रिलपर्यंत नाफेड केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करणारच अशी घोषणा केली होती.  पण त्यानंतर तब्बल पाच दिवसांनी याबाबतचा प्रत्यक्ष जीआर निघालाय. राज्यभरात तुरीच्या मुद्द्यावरून आगडोंब उसळलेला असल्याने राज्य सरकारने खास जीआर काढून शिल्लक राहिलेली 10 लाख क्विंटल तूर घेण्यासाठी बाजारा हस्तक्षेप योजना जाहीर केलीय. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि मुंबई आणि विदर्भ पणन महासंघाकडे या संस्थांना नोडल संस्था म्हणून नेमण्यात आलंय.

राज्य सरकारच्या तूर खरेदीसाठी नाफेड आणि भारतीय अन्न महामंडळाच्या खरेदी समकक्ष नियम निश्चित करण्यात आलेत. यानुसार एफएक्यू दर्जाची तूर रु.५०५० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी होईल. तूर खरेदीच्या आधी शिल्लक तुरीचा तहसिलदारांकडून पंचनामा करण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने बाजार समितीच्या आवारातील खरेदीला सुरूवात करण्यात येईल. दरम्यान जे व्यापारी शेतकऱ्यांच्या नावावर तूर खरेदी करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार असा दमही मुख्यमंत्र्यांनी भरलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 07:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading