Home /News /maharashtra /

संजय राऊत पुन्हा एकदा काँग्रेसची अडचण करणार? तिसऱ्यांदा घेतला काँग्रेसशी पंगा

संजय राऊत पुन्हा एकदा काँग्रेसची अडचण करणार? तिसऱ्यांदा घेतला काँग्रेसशी पंगा

महाराष्ट्रात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या काही दिवसात तिसऱ्यांदा संजय राऊत यांनी काँग्रेसच्या भूमिकेशी थेट विसंगत वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेबरोबर सत्तासोबत करताना काँग्रेसची अडचण होऊ शकते.

पुढे वाचा ...
  मुंबई, 6 मार्च : शिवसेना खासदार संजय राऊत यांना महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारची तिघाडी जुळवल्याचं श्रेय दिलं जातं. पण राऊत यांच्यामुळे काँग्रेसबरोबरचा तणाव वाढल्याचेही प्रसंग घडले आहेत. आता अयोध्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसच्या विचारधारेविरोधात बोलल्यामुळे आघाडीतल्या पक्षांमध्ये बिघाडी निर्माण होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्याशी राऊतांचे उत्तम संबंध पहिल्यापासूनच आहेत. पण काँग्रेसच्या विचारधारेशी कायम फारकत घेतलेल्या शिवसेनेला मात्र एकत्र सरकार स्थापन झाल्यापासून आपली कडक हिंदुत्ववादाची भूमिका जपून जाहीर करावी लागते आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना एकदा तर इंदिरा गांधींविषयीचं वक्तव्य मागे घ्यायची वेळ आली होती. इंदिरा गांधींबद्दलचं वक्तव्य घेतलं मागे महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून दोन वेळा संजय राऊत यांच्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला होता. जानेवारी महिन्यात थेट इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राऊत अडचणीत आले होते. अंडर वर्ल्ड डॉन करीम लाला यांना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी भेटत असत, असं वादग्रस्त वक्तव्य राऊत यांनी एका मुलाखतीदरम्यान केलं होतं.

  संबंधित - आम्हालाही 'ईंट का जवाब...', काँग्रेसच्या राऊतांचा सेनेला इशारा

   काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांनी आक्षेप घेताच अवघ्या दोन तासांत संजय राऊत यांनी दिवंगत इंदिरा गांधींबद्दलचं वक्तव्य मागे घेत असल्याचं जाहीर करावं लागलं. काँग्रेसच्या मित्रांनी  संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयीच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले होते. सावरकरांवरून काँग्रेसला टोमणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी सावरकरांवरून सुरू असलेल्या वादविवादात उडी घेऊन पुन्हा एकदा कॉंग्रेसवर पुन्हा निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनीदेखील आपलं आडनाव सावरकर नाही, असं म्हणत सावरकरांविषयीची काँग्रेसची भूमिका  जाहीर केल्यानंतर वातावरण पेटलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरून दोन पक्षांमध्ये वादंग झाला. त्या वेळी विनायक दामोदर सावरकर यांना विरोध करणाऱ्यांना राऊत यांनी जाहीरपणे खडे बोल सुनावले. "विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन जे विरोध करीत आहेत त्यांनी दोन दिवस अंदमान येथील तुरुंगात जाऊन राहावे. तेव्हाच त्यांना सावरकरांच्या बलिदानाची, त्यागाची जाणीव होईल." त्यांचं हे वक्तव्य काही काँग्रेस नेत्यांना चांगलंच झोंबलं होतं.

  संबंधित - संजय राऊतांचे काँग्रेससोबत उडाले खटके, म्हणाले - अंदमानच्या तुरुंगात पाठवा तरच....

  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावरकरांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. नरेंद्र मोदी सरकारने सावरकरांना भारतरत्न दिला तर आम्ही विरोध करू, असं चव्हाण यावेळी म्हणाले होते. त्यावेळीसुद्धा राऊत यांनी आक्रमकपणे पुढे येत शिवसेनेची बाजू सावरायचा प्रयत्न केला होता. "सावरकर व त्यांच्यासारख्या असंख्य सशत्र क्रांतिकारकांच्या वाट्याला ज्या यातना, छळ अंदमानच्या तुरुंगात आला तशा यातना गांधी, नेहरू, बोस, सरदार पटेल यांच्या वाट्याला आल्या नाहीत", असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा नेहरू आणि सावरकरांची तुलना केली होती.

  संबंधित - काँग्रेसने डोळे वटारताच संजय राऊतांनी मागे घेतलं इंदिरा गांधींबद्दलचं 'ते' वक्तव्य

  या सगळ्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसदरम्यानचा तणाव वाढला होता. तो जरा कुठे निवळतोय असं वाटत असताना आता उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेचा हिंदुत्ववादी चेहरा पुन्हा उजळला आहे. तो काँग्रेसला तापदायक ठरू शकतो. त्यातच राऊत यांनी या दौऱ्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 'काँग्रेस नेत्यांनीही अयोध्येला यावं', असं आवाहन केलं आहे. संबंधित - संजय राऊत म्हणाले, रामलल्लाच्या कृपेनेच उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राम मंदिर हा शिवसेनेसाठी अग्रक्रमाचा विषय असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. त्यामुळे पुन्हा अडचणीचा विषय चर्चेत आल्याने आघाडीत बिघाडी होते का याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे यांचा अयोध्या दौरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर आहेत. सोबत पती रश्मी ठाकरे आणि चिरंजिव आदित्य ठाकरे असतील. शनिवारी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री रामाचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणजे रामाचा प्रसाद आहे. रामलल्लाच्या कृपेनेच उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोनाच्या दहशतीमुळे  महाआरती रद्द खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी सांगितलं की, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर शरयू नदीवर महाआरती करणार नाहीत. दरम्यान, शरयू नदीवर महाआरतीचं नियोजन करण्यात आलं होतं. परंतु, जास्त गर्दी होईल, या पार्श्वभूमीवर केंद्र आणि उत्तर प्रदेशच्या राज्य आरोग्य विभागाने विनंती केल्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अन्य बातम्या अमिताभ बच्चन यांनी सांगूनही अर्थसंकल्पाच्या भाषणात अजित पवारांनी केली मोठी चूक ठाकरे सरकारला विदर्भ, मराठवाड्याचा विसर; अर्थसंकल्पानंतर फडणवीसांनी डागली तोफ केंद्रावर टीका पण गडकरींचे मानले आभार, अर्थसंकल्पात अजित पवारांची गुगली
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Ayodhya, Congress, Sanjay Raut (Politician), Shiv Sena (Political Party)

  पुढील बातम्या