Home /News /maharashtra /

Maharashtra Corona : महाराष्ट्र सरकारचा अवघ्या बारा तासात यूटर्न, ब्यूटी पार्लर आणि जीमसाठी नवी नियमावली जारी

Maharashtra Corona : महाराष्ट्र सरकारचा अवघ्या बारा तासात यूटर्न, ब्यूटी पार्लर आणि जीमसाठी नवी नियमावली जारी

प्रातिनिधिक फोटो (साभार : सोशल मीडिया)

प्रातिनिधिक फोटो (साभार : सोशल मीडिया)

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकार सतर्क झालं आहे. राज्य सरकारने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेसाठी नवी नियमावली जारी केली आहे.

    मुंबई, 9 जानेवारी : राज्यात कोरोनाबाधितांची (Maharashtra Corona) संख्या वाढत असल्याने राज्य सरकार (Maharashtra Government) सतर्क झालं आहे. राज्य सरकारने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेसाठी नवी नियमावली (Corona New Guidelines) जारी केली आहे. या नियमावलीत काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. संबंधित कडक निर्बंध आज रात्री बारावाजेपासून राज्यभरात जारी होतील. संबंधित नियमावली शनिवारी (8 जानेवारी) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राज्य सरकारकडून जारी करण्यात आली होती. या नियमावलीमध्ये सलूनसाठी (Salon) 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. पण ब्यूटी पार्लर (Beauty Parlor) आणि जीम (Gym) यांना पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. याबाबत राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने सलूनसारखंच ब्यूटी पार्लर आणि जीमला देखील 50 टक्के क्षमतेने अटी-शर्तींच्या अधीन राहून सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. ब्यूटी पार्लरसाठी नवे नियम काय? राज्य सरकारकडून सलूनसाठी जी नियमावली जारी करण्यात आली आहे तीच नियमावली ब्यूटी पार्लरसाठी देखील असेल. ब्यूटी पार्लरमध्ये देखील 50 टक्केच ग्राहकांना परवानगी मिळेल. याशिवाय मास्क व्यतिरिक्त ज्या सेवा ब्युटी पार्लरमध्ये घेता येत होत्या त्या आता पुढच्या आदेशापर्यंत घेता येणार नाही. ब्यूटी पार्लरला गेल्यानंतर तोंडावरुन एक सेकंदसुद्धा मास्क हटवता कामा नये. याशिवाय ब्यूटी पार्लरला जाणाऱ्या ग्राहकाचे दोन्ही लसीचे डोस घेतलेले असावेत. तसेच ब्यूटी पार्लरचालकाने देखील दोन्ही लसीचे डोस घेतलेले असावेत. हेही वाचा : Rajesh Tope : ...तर राज्यात लॉकडाऊन लागणार? राजेश टोपेंचं सूचक विधान जीमसाठी नवे नियम काय? राज्यातील जीम बंदचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयावरही परत विचार करण्यात आला आहे. राज्यातील जीम 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण जीममध्ये कोणताही व्यायाम करताना तोंडावरुन मास्क निघता कामा नये, असं सरकारकडून बजावण्यात आलं आहे. तसेच जीममध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांसह व्यायामासाठी येणाऱ्या ग्राहकांनी दोन्ही लसीचे डोस घेतलेले असणं बंधनकारक असेल. हेअर कटींग सलूनसाठी नेमके नियम काय? 1. 50 टक्के क्षमता 2. रोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. 3. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील. 4. हेअर कटींग सलून्सनी कोव्हिडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन करावे तसेच केस कापणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे. हेही वाचा : राज्यात कठोर निर्बंध; पाहा नियमावली जशीच्या तशी, वाचा काय राहणार सुरू काय बंद फक्त सलूनला परवानगी मिळाल्यानंतर ब्यूटी पार्लर आणि स्पा व्यावसायिकांची ऑनलाईन बैठक खरंतर राज्य सरकारने 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्र सलून अॅण्ड ब्युटी पार्लर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी सलून बरोबरच ब्युटी पार्लर व्यावसाय देखील सुरु ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर आणि स्पा व्यवसायिकांची दुपारी 1 वाजता ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. याशिवाय ब्युटी पार्लर व्यावसायास परवानगी दिली नसल्याने  व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. जाहीर केलेल्या नवीन नियमावली मध्ये थोडा बदल करून ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून व ब्युटी पार्लर असोसिएशन कडून करण्यात आली होती. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये सलून व्यावसायाला सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याबद्दल आभार. सर्व सलून व ब्युटी पार्लर चालकांनी कोरोनाचे नियम पाळून स्वतःची व ग्राहकांची काळजी घ्यावी, असे अवाहन सलुन व ब्युटी पार्लर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी केले होते.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या