भाजपचा 54 चा दावा; पण अजित पवारांबरोबर नेमके किती आमदार फुटले?

भाजपचा 54 चा दावा; पण अजित पवारांबरोबर नेमके किती आमदार फुटले?

या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबर ही तारीख आहे. भाजपचा 54 आमदारांचा दावा असला तरी नेमके किती आमदार अजित पवार यांच्याबरोबर फुटले आहेत?

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर : एका रात्रीत झालेल्या नाट्यमय घडामोडींमधून महाराष्ट्रात पुन्हा फडणवीस सरकार आलं आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यंमत्रिपदाची शपथ घेतली. आता या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबर ही तारीख आहे. एकीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा हा निर्णय नाही हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे  आता अजित पवार यांच्यासमवेत नेमके किती आमदार भाजपच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत असा प्रश्न आहे.

अजित पवार यांच्याबरोबर साधारण 25 आमदार असण्याची प्राथमिक माहिती आहे. 25 अधिक भाजपकडे असलेले 120 असा 145 पर्यंतचा आकडा गाठू शकेल. पण हे 25 आमदार फुटले तर पक्षांतरबंदी कायद्याद्वारे वैध ठरेल का हा प्रश्न आहे.

दुसरीकडे भाजप नेत्यांनी मात्र आमच्याकडे राष्ट्रवादीच्या सर्व 54 आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपकडे राष्ट्रवादीच्या सर्व 54 आमदारांचं पत्र असल्याचा दावा केला आहे. News18 शी फोनवरून बोलताना त्यांनी ही माहिती दिली. भाजप सरकारचं संख्याबळ त्यामुळे 170 पर्यंत पोहोचलं आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले. आम्हाला बहुमत सिद्ध करणं सहज शक्य असल्याचा दावाही त्यांनी केला.

सकाळपासूनच्या घडामोडी एवढ्या वेगाने घडत आहेत, की यावर आता विरोधात बसणाऱ्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया अद्याप आलेल्या नाहीत. शरद पवार यांनी केलेल्या ट्वीटनुसार, राष्ट्रवादीचा या निर्णयाला पाठिंबा नाही. हा अजित पवार यांनी घेतलेला निर्णय़ आहे. पण त्याचबरोबर शरद पवार यांना समजून घ्यायला १०० वर्षं लागतील, असं संजय राऊत म्हणाले होते. त्याचीही इथे आठवण ठेवायला हवी.

कालच्या बैठकीला उपस्थित असलेले अजित पवार अचानक फुटले कसे? शिवसेनेच्या पर्यायी सरकारात कदाचित अजित पवार यांना मोठं खातं मिळण्याची शक्यता नसल्याची यात शक्यता आहे.

राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

 

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: November 23, 2019, 10:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading