निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, अध्यादेश जारी

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, अध्यादेश जारी

गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या 'निसर्ग' चक्रीवादळामुळे राज्यात अनेकांना बेघर केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जून: गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या 'निसर्ग' चक्रीवादळामुळे राज्यात अनेकांना बेघर केलं आहे. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. आता चक्री नुकग्रस्तांना वाढीव मदतीचा राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

नुकसानग्रस्तांच्या मदतीबाबत 17 जूनला झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मदतीत वाढ करण्याचा निर्णय झाला होता. त्याचा आदेश बुधवारी जारी करण्यात आला आहे. SDRF आणि NDRF च्या अटी आणि निकषांमध्ये बदल करुन राज्य सरकार आता आपल्या निधीतून ही मदत करणार आहे.

हेही वाचा.. धक्कादायक! राज्यसभेतील 16 खासदारांवर खून, बलात्कार, दरोडा सारखे गंभीर गुन्हे

अशी असणार वाढीव मदत...

- नैसर्गिक आपत्तीमध्ये घरांचं पूर्णत: नुकसान झालं असल्यास घरगुती भांडी आणि वस्तुंच्या नुकसानासाठी आता 5000 रुपये देण्यात येणार आहे.

-अंशत: पडझड झालेल्या म्हणजे किमान 15 टक्के नुकसान झालेल्या कुटुंबांना आता 6000 रुपयांऐवजी 15000 रुपये देण्यात येणार आहे.

-अंशतः पडझड परंतु किमान 25 टक्के नुकसान झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठी नव्या निर्णयाने 25000 रुपये प्रति घर मदत देण्यात येणार आहे

-अंशतः पडझड झालेल्या किमान 50 टक्के नुकसान झालेल्या कुटुंबांना नव्या निर्णयाने प्रति घर 50000 रुपये देण्यात येणार आहे

-त्यासोबतच पूर्णतः नष्ट झालेल्या पक्या आणि कच्च्या घरांसाठी प्रचलित दरानुसार 95100 रुपये मदत सखल भागात दिली जात होती. तसेच दुर्गम भागात 101900 रुपये मदत दिली आत होती. आता सरसकट दीड लाख प्रती घर इतकी करण्यात येणार आहे.

हेही वाचा..  नशा शराब में होता तो नाचती बोतल! उपकेंद्रात रंगलेल्या ओली पार्टीचा VIDEO व्हायरल

त्यासोबत मत्स्य व्यावसायिकांचीही नुकसानाची रक्कम वाढवण्यात आली आहे

- बोटींची अंशत: दुरुस्ती करण्यासाठी 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत

-पूर्णतः नष्ट झालेल्या बोटींसाठी 25 हजार रुपये देण्यात येतील.

- अंशतः बाधीत झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी 5 हजार रुपये दिले जाणार आहेत

First published: June 24, 2020, 8:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading