मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शासकीय कार्यालयात हॅलोऐवजी वंदे मातरम्, वादानंतरही सरकारचं परिपत्रक जारी

शासकीय कार्यालयात हॅलोऐवजी वंदे मातरम्, वादानंतरही सरकारचं परिपत्रक जारी

शासकीय कार्यालयात हॅलोऐवजी वंदे मातरम् म्हणण्यात यावं, असं आवाहन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केलं होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 ऑक्टोबर : शासकीय कार्यालयात हॅलोऐवजी वंदे मातरम् म्हणण्यात यावं, असं आवाहन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केलं होतं. सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता, तसंच याला काही संघटनांकडून विरोधही करण्यात आला होता. या वादानंतरही शासनाकडून हॅलोऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचं अधिकृत शासन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

सर्व सरकारी अस्थापनांना सामान्य प्रशासन विभागाकडून हे आवाहन करण्यात आलं आहे. आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. वंदे मातरम् या शब्दाला जाज्वल्य इतिहास आहे, असा उल्लेख या परिपत्रकात करण्यात आला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शासकीय कार्यालयात हॅलोऐवजी वंदे मातरम् म्हणण्यात येईल याची घोषणा केली होती. याला रझा अकादमी तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विरोध करण्यात आला होता.

वंदे मातरम् चा वाद वाढल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. 'इंग्रजांकडून किंवा परदेशातून आलेल्या हॅलो शब्दाऐवजी वंदे मातरम् शब्द वापरावा, असं अभियान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या विभागाने सुरू केलं आहे. वंदे मातरम् ऐवजी कुणी राष्ट्रभक्ती, देशभक्ती व्यक्त करणारा तोडीचा शब्द वापरत असेल, तर त्याला आमचा विरोध नाही. हॅलो शब्द रझा अकादमीसाठी देशभक्तीला प्रेरणा देणारा असेल, तर प्रश्न उपस्थित होत नाही. आम्ही असा कोणताही कायदा केलेला नाही. मी हॅलोऐवजी फक्त वंदे मातरम् हाच शब्द वापरा, असं म्हणलेलं नाही,' असं मुनगंटीवार म्हणाले होते.

...तर मी वंदे मातरम म्हणणार नाही, आपण ज्या ऑर्डर काढतो त्याचे भान ठेवायला हवे, छगन भुजबळांची जोरदार टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक फोन केल्यावर जय महाराष्ट्र म्हणतात, आता मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवारांना काय म्हणायचं ते विचारावं, असा टोला भुजबळ यांनी हाणला होता.

First published:

Tags: Sudhir mungantiwar