मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी ! ठाकरे सरकारची वचनपूर्ती, मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख

मोठी बातमी ! ठाकरे सरकारची वचनपूर्ती, मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख

 'हनुमान चालीसा तुमच्या घरात नीट म्हणण्याची संस्कृती नसेल किंवा पद्धत नसेल तर या आमच्या घरी या बोलायची असेल तर जरूर बोला

'हनुमान चालीसा तुमच्या घरात नीट म्हणण्याची संस्कृती नसेल किंवा पद्धत नसेल तर या आमच्या घरी या बोलायची असेल तर जरूर बोला

मराठा आरक्षण (Maratha Andolan) आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याच्या आश्वासनाची महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) पूर्तता केली आहे.

  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 30 नोव्हेंबर : मराठा आरक्षण (Maratha Andolan) आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याच्या आश्वासनाची महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) पूर्तता केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण 34 कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे. संबंधित कुटुंबाना 10 लाख रुपये देण्याची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात केवळ 15 कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात आली होती. मागील सरकारचे हे आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल. या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना दिला होता.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 कोटी 65 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग

उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 कोटी 65 लाख रुपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे. आजवर शासनाची मदत न मिळालेल्या 19 वारसांना प्रत्येकी 10 लाख तर यापूर्वी 5 लाख रुपये मिळालेल्या 15 वारसांना प्रत्येकी आणखी 5 लाख रुपये या निधीतून दिले जातील.

हेही वाचा : मुंबईपाठोपाठ नागपूरमध्येही उद्या शाळेचं दार उघडणार नाही, पालिकेची घोषणा

अशोक चव्हाणांनी मानले आभार

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण 34 कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग केल्यानिमित्ताने सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या 34 कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. मराठा समाजाच्या मागणीनुसार सदरहू निधी निर्गमित केल्याबद्दल अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

First published: