सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा, शिर्डी संस्थानवर पुनर्नियुक्ती टळली

शिर्डी संस्थानवर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विश्वस्त बोर्डला सुप्रीम कोर्टाचे अभय मिळालं आहे.

शिर्डी संस्थानवर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विश्वस्त बोर्डला सुप्रीम कोर्टाचे अभय मिळालं आहे.

  • Share this:
05 फेब्रुवारी : शिर्डी संस्थानवर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विश्वस्त बोर्डला सुप्रीम कोर्टाचे अभय मिळालं आहे. त्यामुळे शिर्डी संस्थानवर सदस्यांची पुनर्नियुक्ती करण्याची राज्य सरकारवरची नामुष्की टळली आहे. शिर्डी संस्थान एक्ट नुसार जुलै 2016 मध्ये राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विश्वस्त सदस्यांवर गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या नियुक्त्या रद्द कराव्या अशी मागणी करणाऱ्या 5 जनहीत याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाने सरकारने या नियुक्त्यांबाबत पुनर्विचार करावा असे आदेश राज्य सरकारला दिले होते. यावर महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. ज्यावर आज सोमवारी सुनावणी झाली. राज्य सरकार नियुक्त सदस्यांवर केवळ गुन्हे दाखल आहेत,  चार्जशीट, दोष सिद्धता झालेली नाही त्यामुळे या नियुक्त्या कायम ठेवाव्या असं राज्य सरकारने म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाने सरकारचे हे म्हणणे ग्राह्य धरत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिलीये. नियुक्तीबाबत पुनर्विचार करावा या संदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर दोन महिन्यांनंतर सुनावणी सुरू होईल.
First published: