Elec-widget

मुख्यमंत्रिपदासाठी महाशिवआघाडीचे 4 नेते स्पर्धेत, कोण ठरणार किंग?

मुख्यमंत्रिपदासाठी महाशिवआघाडीचे 4 नेते स्पर्धेत, कोण ठरणार किंग?

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतूनच तीन तर राष्ट्रवादीकडून एका नेत्याचं नाव चर्चेत आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून 20 दिवस लोटल्यानंतरही अद्याप महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळालेला नाही. मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपला शिवसेनेसोबतच्या वादानंतर सत्तेपासून दूर राहावं लागलं आहे. त्यानंतर आता राज्यात नव्या समीकरणांची नांदी पाहायला मिळत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं अनोखा सत्तासमीकरण आकार घेत आहे. या तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्रही सुरू झालं आहे. अशातच मुख्यमंत्रिपदासाठी चार नेत्यांची नावं चर्चेत आहेत.

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपने सत्तास्थापनेचा दावा सोडल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळालेली शिवसेना सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेताना दिसत आहे. राज्यात राष्ट्रपती जागावट लागली असली तरीही शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू आहेत. हे सत्तेचं गणित जुळून आल्यास महाराष्ट्रात तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतूनच तीन तर राष्ट्रवादीकडून एका नेत्याचं नाव चर्चेत आहेत.

1. आदित्य ठाकरे

वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे पहिले ठाकरे ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी प्रोजेक्ट केलं जात असल्याचं पाहायला मिळत होतं. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी याबाबत इच्छाही व्यक्त केली होती. मात्र निवडणूक निकालानंतर कोणाकडूनही आदित्य ठाकरे यांचं नाव आक्रमकपणे पुढे आणलं जात नसल्याचं दिसत आहे. कारण सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे संसदीय राजकारणात नवख्या असणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या नावावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सहमती होणार का, याबाबत संभ्रम आहे.

2. एकनाथ शिंदे

Loading...

ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर पकड निर्माण करणाऱ्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं पक्षातही चांगलं वजन आहे. अनेक आमदारांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात. तसंच मागील युती सरकारमध्ये ते मंत्रीही होते. पक्षातील त्यांच्या कामाच्या अनुभवामुळेच शिवसेनेनं आताही त्यांच्या खांद्यावर विधीमंडळ गटनेतेपदाची जबाबदारी टाकली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून ठाकरे कुटुंबाबाहेरील व्यक्तीचा मुख्यमंत्रिपदासाठी विचार झाल्यास एकनाथ शिंदे यांचं नाव आघाडीवर असू शकतं.

3. उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावरून थेट भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं वचन पूर्ण करत मी महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणारच, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात महाशिवआघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत उद्धव ठाकरे यांचं नाव सर्वात पुढे असू शकतं. कारण उद्धव ठाकरे यांचा राजकारणातील अनुभव लक्षात घेता त्यांना आघाडीतील इतर पक्षाचा विरोध होण्याची शक्यता कमी आहे.

4. अजित पवार

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या जागा निवडणुकीत आल्या आहेत. शिवसेनेनं 56 तर राष्ट्रवादीने 54 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमध्ये फार मोठा फरक नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात येऊ शकतो. अशातच राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते असलेले अजित पवार यांचं नाव पक्षाकडून मुख्यमंत्रिपदासाठी समोर येऊ शकतं.

BREAKING VIDEO : अजित पवार नाराज झाले का? जितेंद्र आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2019 09:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...