राज्यात कुणाचं येणार सरकार? या आहेत सत्तास्थापनेच्या 6 शक्यता

राज्यात कुणाचं येणार सरकार? या आहेत सत्तास्थापनेच्या 6 शक्यता

राज्यात सत्तेचा संघर्ष शिगेला पोहोचलाय. सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरू आहेत. त्यासाठी वेगवगेळ्या शक्यता आजमावल्या जात आहेत. पाहूया सत्तास्थापनेच्या या 6 शक्यता.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : राज्यात सत्तेचा संघर्ष शिगेला पोहोचलाय. भाजप आणि शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी हट्टाला पेटलेत. त्यामुळे सत्तास्थापनेचा दिवस लांबत चाललाय. पण सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरू आहेत. त्यासाठी वेगवगेळ्या शक्यता आजमावल्या जात आहेत. पाहूया सत्तास्थापनेच्या या 6 शक्यता

1.मनोमिलन

भाजप-शिवसेनेचं मनोमिलन होईल.शिवसेना उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारेल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.

2.सत्तेसाठी नकार

शिवसेनेनं सत्तेत सहभागी होण्यास नकार दिला तर विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापनेचा दावा करावा लागेल आणि 15 दिवसांत बहुमत सिद्ध करावं लागेल. पण सर्व अपक्षांनी पाठिंबा दिला तरीही 145 चा आकडा त्यांना गाठता येऊ शकत नाही. अपक्ष आणि इतर अशा एकूण 29 जणांचा पाठिंबाही उपयोगाचा ठरणार नाही. अशावेळी, भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची मदत मागू शकते. बहुमत चाचणीच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहिल्यास बहुमताचा आकडा खाली येईल आणि भाजपच्या सरकारवरील धोका टळेल. मात्र अशा परिस्थितीत स्थिर सरकार देणं अत्यंत कठीण असेल.

(हेही वाचा : गेल्या 6 वर्षांत 90 लाखांनी खालावले रोजगार, देशात स्वातंत्र्यानंतरचा नीचांक)

3. फोडाफोडी

शिवसेनेतला आमदारांचा गट फोडून भाजप बहुमत सिद्ध करू शकतं. ही शक्यताही नाकारता येत नाही.

4. विरोधकांना संधी

देवेंद्र फडणवीस बहुमत सिद्ध करू शकले नाहीत तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करू शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होतील किंवा बाहेरून पाठिंबा देतील.

5. आघाडीचं सरकार

राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे 54 आमदार आणि काँग्रसचे 44 आमदार या जोरावर सरकार स्थापन करेल आणि शिवसेना त्यांना बाहेरून पाठिंबा देईल आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं जाईल.

6. राष्ट्रपती राजवट

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यापैकी कुणीही सरकार स्थापन करू शकलं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. त्यानंतर सर्वाधिकार राज्यपालांना मिळतील. भाजपासाठी ती मोठी नामुष्की असेल. मात्र हा पर्यायही त्यांच्या पथ्यावर पडणारा आहे.

एकंदरीतच राज्यात सरकार स्थापन होताना या सहा शक्यता आजमावून पाहिल्या जाताहेत. आता यातली कोणती शक्यता सरकार स्थापन करायला मदत करते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

========================================================================

VIDEO : 'नेत्यांना सुबुद्धी देवो' भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 09:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading