Elec-widget

महाशिवआघाडीत निर्माण झाला नवा पेच, राष्ट्रवादीची 'ही' मागणी शिवसेनेला अमान्य

महाशिवआघाडीत निर्माण झाला नवा पेच, राष्ट्रवादीची 'ही' मागणी शिवसेनेला अमान्य

मुख्यमंत्रिपवरून भाजपसोबत बिनसल्यानंतर शिवसेनेनं आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तावाटपाची बोलणी सुरू केली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला जवळपास तीन आठवडे पूर्ण झाल्यानंतरही राज्यात नव्या सरकारची स्थापना होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्रिपवरून भाजपसोबत बिनसल्यानंतर शिवसेनेनं आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तावाटपाची बोलणी सुरू केली आहे. मात्र राज्यात सत्तास्थापनेसाठी पहिल्यांदाच अशी आघाडी होत असल्याने चर्चेला उशीर होत आहे. त्यातच आता एका मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एका मुद्द्यावरून मतभेद झाल्याची माहिती आहे.

राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही केवळ मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे या दोन्ही पक्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याच मुख्यमंत्रिपदावरून आता महाशिवआघाडीतही मतभेद सुरू आहेत. राष्ट्रवादीने शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाबाबत 50-50 च्या फॉर्म्युल्याची मागणी केली आहे. मात्र पूर्ण पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री हवा, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे या संभाव्य आघाडीत पेच निर्माण झाला आहे. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

मंत्रिपदांच्या वाटणीवरून शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सहमती नसल्याची माहिती आहे. मंत्रिपदाबाबत शिवसेनेनं 16- 14- 12 च्या फॉर्म्युला मांडला आहे. तर तीनही पक्षांना समान म्हणजेच 14-14-14 अशा फॉर्म्युल्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं कळतंय. त्यामुळे सत्तावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

दरम्यान, राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चर्चा सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. राज्यात पुन्हा एकदा भाजपचचं सरकार येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या बैठकीत हा विश्वास व्यक्त केला. राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही असंही ते म्हणाले. सत्ता स्थापनेवेळी मुंबईत बोलावू पण आता लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा सल्लाही त्यांनी नव्याने निवडून आलेल्या आमदारांना दिला. या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी आमदारांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्नही भाजपच्या नेत्यांनी केला. प्रेझेंटेशनद्वारे विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचं विश्लेषण करण्यात आलं. आपलंच सरकार पुन्हा येणार हे शेतकऱ्यांना बांधावर आणि लोकांमध्ये जाऊन सांगा असंही ते म्हणाले.

राज्यातल्या सत्ता संघर्षावर हे मीम्स तुम्ही पाहिलेत का? पाहा हा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2019 09:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...