Home /News /maharashtra /

अजित पवारांविषयी प्रश्न विचारताच सुप्रिया सुळे झाल्या भावुक

अजित पवारांविषयी प्रश्न विचारताच सुप्रिया सुळे झाल्या भावुक

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या whatsapp स्टेटसवर टाकलेला मेसेजची चर्चा होती Party and family split असं त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं होतं.

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : महाराष्ट्रात एका रात्रीत घडलेल्या वेगवान घडामोडींवर शरद पवार यांची अधिकृत भूमिका लवकरच स्पष्ट होईल. पण दरम्यान याविषयी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी घेरलं आणि त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, सुप्रिया यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. शरद पवार पत्रकार परिषदेत निवेदन देतील. त्यानंतरच मी या विषयावर बोलेन, असं सुळे म्हणाल्या. तत्पूर्वी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या whatsapp स्टेटसवर टाकलेला मेसेजची चर्चा होती Party and family split असं त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं होतं. पवार कुटुंबात फूट पडल्याचं त्यांनी मान्य केल्याचं यावरून दिसतं. अजित पवार यांनी धक्का दिला का, असं विचारताच सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यात पाणी आलं. मी याविषयी नंतर बोलेन असं सांगत त्या निघून गेल्या. राष्ट्रवादीचे किती आमदार फुटले? शरद पवार यांनी केलेल्या ट्वीटनुसार, राष्ट्रवादीचा या निर्णयाला पाठिंबा नाही. हा अजित पवार यांनी घेतलेला निर्णय़ आहे. पण त्याचबरोबर शरद पवार यांना समजून घ्यायला १०० वर्षं लागतील, असं संजय राऊत म्हणाले होते. त्याचीही इथे आठवण ठेवायला हवी. अजित पवार यांच्याबरोबर साधारण 25 आमदार असण्याची प्राथमिक माहिती आहे. 25 अधिक भाजपकडे असलेले 120 असा 145 पर्यंतचा आकडा गाठू शकेल. पण हे 25 आमदार फुटले तर पक्षांतरबंदी कायद्याद्वारे वैध ठरेल का हा प्रश्न आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांनी मात्र आमच्याकडे राष्ट्रवादीच्या सर्व 54 आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपकडे राष्ट्रवादीच्या सर्व 54 आमदारांचं पत्र असल्याचा दावा केला आहे. News18 शी फोनवरून बोलताना त्यांनी ही माहिती दिली. भाजप सरकारचं संख्याबळ त्यामुळे 170 पर्यंत पोहोचलं आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले. आम्हाला बहुमत सिद्ध करणं सहज शक्य असल्याचा दावाही त्यांनी केला. शुक्रवारच्या बैठकीत नेमकं काय? एका रात्रीत नेमकं काय घडलं हे अजून पुरतं स्पष्ट झालेलं नसलं, तरी पडद्यामागच्या घडामोडींचा भाग १ हळूहळू समोर येत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठकीतून बाहेर पडताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, "माझ्याकडे आत्ता सांगण्यासारखं पूर्ण काही नाही. अर्धवट माहिती मी देणार नाही. अजून चर्चा सुरू आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईन." कुठलाही प्रश्न अनुत्तरित ठेवणार नाही असं सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातून चर्चा संपली नसल्याचं सांगितलं.
    Published by:Arundhati Ranade Joshi
    First published:

    Tags: Maharashtra Assembly Election 2019, Maharashtra government, Sharad Pawar (Politician), Supriya Sule (Politician)

    पुढील बातम्या