सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारकडे 30 तास

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारकडे 30 तास

या सरकारकडे बहुमत नसल्याचा आक्षेप घेत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : राज्यात भाजपने राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या मदतीने सरकार स्थापन केलं आहे. मात्र या सरकारकडे बहुमत नसल्याचा आक्षेप घेत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवरच सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने उद्या 27 नोव्हेंबरला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उद्या फडणवीस सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

काय आहे कोर्टाचा निर्णय?

-महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी

-उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणी घ्या

-गुप्त मतदान नको

-खुल्या पद्धतीने मतदान होणार

-बहुमत चाचणीचं लाईव्ह रेकॉर्डिंग होणार

दरम्यान, महाधिवक्ता तुषार मेहता यांनी काल राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद सुरू केला. त्यांनी राज्यपालांच्या निर्णयाच्या न्यायालयीन आढावा घेण्यास प्राथमिक आक्षेप घेतला होता.

सुप्रीम कोर्टात काल काय घडलं?

-आज सकाळपर्यंत न्यायालयानं निर्णय राखून ठेवला

-कोर्टानं निर्णय राखून ठेवला . आज सकाळी साडेदहा वाजता न्यायालय निर्णय देणार

-हंगामी अध्यक्षामार्फत बहुमताची चाचणी मंगळवारी घेऊ नका - मुकुल रोहतगी

-मंगळवारी बहुमत चाचणी घेण्याची परवानगी देऊ नका - मुकुल रोहतगी

राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून 54 आमदारांच्या सह्यांचे पत्र दिले - तुषार मेहता

अजित पवारांनी दिलेले पक्ष 22 नोव्हेंबर रोजीचे आहे - तुषार मेहता

बहुमतासाठी 3 पक्षांना वेळ दिली- मेहता

9 नोव्हेंबरपर्यंत राज्यपालांनी वाट पाहिली- तुषार मेहता, महाधिवक्ता

राष्ट्रपती राजवट नको म्हणून फडणवीस यांना पाठिंबा, असं अजित पवार यांनी पत्रात म्हटलं आहे - तुषार मेहता

राष्ट्रपती राजवट जास्त दिवस रहायला नको, ही अजित पवारांची भूमिका - तुषार मेहता

'मीच राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पक्षातील वाद आम्ही सोडवू,' अशी अजित पवारांची भूमिका - कोर्टात अजित पवारांचे वकिल

या प्रकरणी सविस्तर सुनावणीची गरज- तुषार मेहता

भाजपच्या वतीने मुकुल रोहतगी हे युक्तीवाद करत आहेत

एक पवार आमच्या सोबत तर दुसरे विरोधात- रोहतगी

इतर पक्षांनी आणि अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला- रोहतगी

निवडणूक पूर्व मित्रांनी आमची साथ सोडली- रोहतगी

बहुमत सिद्ध करण्याची तारीख कोर्ट ठरवू शकत नाही- रोहतगी

राज्यपालांनी आधीच बहुमत सिद्ध करण्याची तारीख निश्चित केली- रोहतगी

मुख्यमंत्र्यांकडे बहुमतासाठीचे संख्याबळ आहे का? कोर्टाची विचारणा

बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 5 दिवस शिल्लक- रोहतगी

कर्नाटकासारखा कोणताही अंतरिम निर्णय देऊ नका- रोहतगी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2019 10:43 AM IST

ताज्या बातम्या