सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने उद्या (बुधवार)बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील फडणवीस सरकारचं भवितव्य उद्या ठरणार आहे. या सरकारकडे बहुमत नसल्याचा आक्षेप घेत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'सत्यमेव जयते, भाजपचा खेळ संपला,' असं ट्वीट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर राष्ट्रवादीच्या गोटात आनंद असल्याचं दिसत आहे. सुप्रीम कोर्टाने उद्याच बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. फडणवीस सरकार बहुमत कसं सिद्ध करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात आमदारांचा घोडाबाजार होणार का, याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.

काय आहे कोर्टाचा निर्णय?

-महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी

-उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणी घ्या

-गुप्त मतदान नको

-खुल्या पद्धतीने मतदान होणार

-बहुमत चाचणीचं लाईव्ह रेकॉर्डिंग होणार

दरम्यान, महाधिवक्ता तुषार मेहता यांनी काल राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद सुरू केला. त्यांनी राज्यपालांच्या निर्णयाच्या न्यायालयीन आढावा घेण्यास प्राथमिक आक्षेप घेतला होता.

सुप्रीम कोर्टात काल काय घडलं?

-आज सकाळपर्यंत न्यायालयानं निर्णय राखून ठेवला

-कोर्टानं निर्णय राखून ठेवला . आज सकाळी साडेदहा वाजता न्यायालय निर्णय देणार

-हंगामी अध्यक्षामार्फत बहुमताची चाचणी मंगळवारी घेऊ नका - मुकुल रोहतगी

-मंगळवारी बहुमत चाचणी घेण्याची परवानगी देऊ नका - मुकुल रोहतगी

राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून 54 आमदारांच्या सह्यांचे पत्र दिले - तुषार मेहता

अजित पवारांनी दिलेले पक्ष 22 नोव्हेंबर रोजीचे आहे - तुषार मेहता

बहुमतासाठी 3 पक्षांना वेळ दिली- मेहता

9 नोव्हेंबरपर्यंत राज्यपालांनी वाट पाहिली- तुषार मेहता, महाधिवक्ता

राष्ट्रपती राजवट नको म्हणून फडणवीस यांना पाठिंबा, असं अजित पवार यांनी पत्रात म्हटलं आहे - तुषार मेहता

राष्ट्रपती राजवट जास्त दिवस रहायला नको, ही अजित पवारांची भूमिका - तुषार मेहता

'मीच राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पक्षातील वाद आम्ही सोडवू,' अशी अजित पवारांची भूमिका - कोर्टात अजित पवारांचे वकिल

या प्रकरणी सविस्तर सुनावणीची गरज- तुषार मेहता

भाजपच्या वतीने मुकुल रोहतगी हे युक्तीवाद करत आहेत

एक पवार आमच्या सोबत तर दुसरे विरोधात- रोहतगी

इतर पक्षांनी आणि अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला- रोहतगी

निवडणूक पूर्व मित्रांनी आमची साथ सोडली- रोहतगी

बहुमत सिद्ध करण्याची तारीख कोर्ट ठरवू शकत नाही- रोहतगी

राज्यपालांनी आधीच बहुमत सिद्ध करण्याची तारीख निश्चित केली- रोहतगी

मुख्यमंत्र्यांकडे बहुमतासाठीचे संख्याबळ आहे का? कोर्टाची विचारणा

बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 5 दिवस शिल्लक- रोहतगी

कर्नाटकासारखा कोणताही अंतरिम निर्णय देऊ नका- रोहतगी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2019 11:08 AM IST

ताज्या बातम्या