काँग्रेसला 13 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता, या नेत्यांची नावे सर्वात पुढे

काँग्रेसला 13 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता, या नेत्यांची नावे सर्वात पुढे

आगामी मंत्रिमंडळात काँग्रेसला 13 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर काँग्रेस नेतृत्व थेट विधानसभा अध्यक्ष पदासाठी दावा करत असल्याची माहिती आहे. आगामी मंत्रिमंडळात काँग्रेसला 13 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 9 कॅबिनेट, 4 राज्यमंत्री असणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात शिवसेनेनंतर सत्तेतील दुसरा मोठा पक्ष आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसची अपेक्षा आहे. महाविकासआघाडीमध्ये शिवसेनेचे आमदार जास्त असल्यानं कादाचित सेनेच्या खात्यातही हे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र विधानसभा अध्यक्षपदावरून कुरबुरी असल्यानं पुन्हा वाद होण्याची चिन्हं आहेत. परिणामी बहुमत सिद्ध कऱण्यावर याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सगळं अलबेल ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आव्हान आहे.

कॅबिनेटपदासाठी काँग्रेस नेत्यांची संभाव्य नावे

विदर्भ( 3) : वडदेटीवार, यशोमती ठाकूर, नाना पटोले

मुंबई(2): वर्षा गायकवाड, अमीन पटेल

मराठवाडा (2): अशोक चव्हाण, अमित देशमुख

पश्चिम महाराष्ट्र (2): सतेज बंटी पाटील, विश्वजित कदम

9 कॅबिनेट मंत्रिपदांसह काँग्रेसला 4 राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. मात्र उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्ष या पदांसाठी चर्चेत असलेल्या बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या बद्दल अजूनही स्पष्ट निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आलेला नाही.

मंत्रिपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीतून कुणाची नावं आहेत चर्चेत?

शिवसेना

एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील

राष्ट्रवादी

धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटिल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Congress
First Published: Nov 27, 2019 02:19 PM IST

ताज्या बातम्या