मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'शिवसेनेच्या आमदाराला भाजपकडून 50 कोटींची ऑफर'

'शिवसेनेच्या आमदाराला भाजपकडून 50 कोटींची ऑफर'

'शिवसेनेच्या आमदाराला 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली.'

'शिवसेनेच्या आमदाराला 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली.'

'शिवसेनेच्या आमदाराला 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली.'

    मुंबई, 8 नोव्हेंबर : 'भाजपकडून काही आमदारांना संपर्क करून प्रलोभन द्यायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या आमदाराला 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. तसंच आमच्या आमदारांना पण संपर्क करण्यात आला आहे. हा सत्तेचा घोडेबाजार उघड झाला पाहिजे. म्हणून आमदारांना सांगितलं आहे की फोन कॉल रेकॉर्ड करा, हे पुरावे जनतेसमोर दाखवायचे आहेत,' असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

    'काही आमदार फिरायला जयपूरला गेले असतील. निवडणुकीचा थकवा घालवण्यासाठी ते गेले असतील. आमचे आमदार आता फुटणार नाहीत. कारण जे आमदार निवडणुकीआधी फुटले होते त्यांची काय अवस्था झाली हे सर्वांसमोर आहे. सोडून गेलेले तब्बल 80 टक्के आमदार पराभूत झाले आहेत,' असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केलं आहे.

    काँग्रेसने आमदारांना जयपूरला हलवलं?

    मागील सरकारचा कार्यकाल संपत आला तरी महाराष्ट्रातील सत्तेची कोंडी फुटू शकलेली नाही. मुख्यमंत्रिपदाच्या आग्रहामुळे निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही भाजप आणि शिवसेनेकडून सत्तास्थापनेला विलंब करण्यात येत आहे. निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा जादुई आकडा गाठता न आल्याने राज्यात कर्नाटकसारखा घोडाबाजार केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसू नये म्हणून काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत.

    काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक होणार आहे. तसंच आमदारांना पक्षाने मुंबईत बोलावून घेतलं आहे. काँग्रेसे आपल्या काही आमदारांना जयपूरला हलवलं असल्याची माहिती आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आमदारांना जयपूर इथं नेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाण्याची शक्यता आहे.

    काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडून फोनवरून आमदारांसमवेत संपर्क सुरू करण्यात आला आहे. काही आमदार आणि नेते यांना मुंबईत बोलवले असून दुपारी बैठक ही होणार असल्याची माहिती आहे. आमदारांना फूस लावून फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला होता. त्यानंतर आता राजकीय पेचप्रसंग लक्षात घेता आमदारांना काही दिवस राजस्थानातील जयपूर इथं हालवण्याची व्यवस्था काँग्रेसकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.

    VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा

    First published:

    Tags: BJP, Congress, Vijay wadettiwar