सत्तास्थापनेच्या खेळात काँग्रेस सतर्क, भाजपच्या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाली

सत्तास्थापनेच्या खेळात काँग्रेस सतर्क, भाजपच्या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाली

निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा जादुई आकडा गाठता न आल्याने राज्यात कर्नाटकसारखा घोडाबाजार केला जाऊ शकतो.

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : मागील सरकारचा कार्यकाल संपत आला तरी महाराष्ट्रातील सत्तेची कोंडी फुटू शकलेली नाही. मुख्यमंत्रिपदाच्या आग्रहामुळे निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही भाजप आणि शिवसेनेकडून सत्तास्थापनेला विलंब करण्यात येत आहे. निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा जादुई आकडा गाठता न आल्याने राज्यात कर्नाटकसारखा घोडाबाजार केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसू नये म्हणून काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत.

काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक होणार आहे. तसंच काही निवडक आमदारांना पक्षाने मुंबईत बोलावून घेतलं आहे. काँग्रेस आपल्या काही आमदारांना जयपूरला हलवण्याच्या तयारीत असल्याचे समजते. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आमदारांना जयपूर इथं नेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या प्रदेश कार्लालयाकडून फोनवरून आमदारांसमवेत संपर्क सुरू करण्यात आला आहे. काही आमदार आणि नेते यांना मुंबईत बोलवले असून दुपारी बैठक ही होणार असल्याची माहिती आहे. आमदारांना फूस लावून फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला होता. त्यानंतर आता राजकीय पेचप्रसंग लक्षात घेता आमदारांना काही दिवस राजस्थानातील जयपूर इथं हालवण्याची व्यवस्था काँग्रेसकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेलाही आहे भीती?

विधानसभा निवडणुकीनंतर आक्रमक झालेली शिवसेना अजूनही शांत झालेली नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असं शिवसेना नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. बहुमतासाठी लागणाऱ्या 144 जागांपासून भाजप मागील निवडणुकीच्या तुलनेत जास्तच दूर राहिल्याने शिवसेनेनं संधी साधली आहे. मात्र भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला त्यांचे आमदार फुटण्याची भीती सतावत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे गुरूवारी झालेल्या बैठकीनंतर सर्व शिवसेना आमदारांना रंगशारदा हॉटेल इथं जाण्याचा आदेश पक्षाकडून देण्यात आला.

दरम्यान, कर्नाटकात कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यानंतर घोडाबाजाराला ऊत आला होता. अनेक पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिवसेना सतर्क झाली आहे. म्हणूनच शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जात असल्याची चर्चा आहे.

VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2019 09:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading