Elec-widget

'या' तारखेला होणार महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी?

'या' तारखेला होणार महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी?

या सरकारमध्ये राष्ट्रवादी थेट सहभागी होईल तर काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल, अशी माहिती आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याने महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. या सरकारमध्ये राष्ट्रवादी थेट सहभागी होईल तर काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल, अशी माहिती आहे.

सोनिया गांधींच्या निवासस्थानावरील काँग्रेस नेत्यांची बैठक नुकतीच संपली आहे. सुमारे अडीच तास महाराष्ट्रातल्या राजकीय तिढ्यावर या बैठकीत चर्चा आणि खलबतं झाली. त्यानंतर सोनिया गांधी यांनी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांना फोन करून उद्धव ठाकरेंशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा फोनवरून चर्चा झाली आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी व्हावा, अशी शिवसेनेची इच्छा आहे. त्यामुळे महाशिवआघाडीतील इतर नेत्यांनी सहमती दाखवल्यास 17 नोव्हेंबरला हा शपथविधी पार पडू शकतो.

राज्यात सत्तेचा वाद मिटला पण आता मुख्यमंत्री कोण?

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल हे वचन मी बाळासाहेब ठाकरेंना दिलं होतं, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शिवसेनेचे नेते संजय राऊत हेही शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे वारंवार सांगत होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. या सगळ्या घडामोडी घडत असताना मातोश्रीबाहेर आधी आदित्य ठाकरेंच्या नावाने बॅनर लागले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा दर्शवणारे बॅनर लागले. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार का या चर्चांना वेग आला.

Loading...

अवघ्या राज्याचं लक्ष

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडून येत पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना कोणतं पद मिळणार याबद्दल उत्सुकता आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झालीय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तिन्ही प्रमुख नेत्यांकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सत्तासंघर्षात भाजपकडून नवी खेळी; संजय राऊत यांचा गंभीर आरोप, पाहा UNCUT VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2019 07:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com