महाराष्ट्रात सरकार कधी येणार? महाविकासआघाडीची चर्चा अजूनही सुरूच; अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित

महाराष्ट्रात सरकार कधी येणार? महाविकासआघाडीची चर्चा अजूनही सुरूच; अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक शुक्रवारी झाली. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी बैठकीतल्या निर्णयाबद्दल संवाद साधला. अजून चर्चा संपली नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची सत्तास्थापनेविषयीची बैठक नुकतीच संपली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि सेना नेते बाहेर पडले. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी बैठकीतल्या निर्णयाबद्दल संवाद साधला. अजून चर्चा संपली नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. चर्चा सकारात्मक झाल्याचं ते म्हणाले. पण अजून काही मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्याही चर्चा सुरू राहणार आहे, असं ते म्हणाले.

महाराष्ट्र सत्तास्थापनेच्या दृष्टीने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची पहिली औपचारिक बैठक मुंबईत नेहरू सेंटरला झाली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह तिन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते सहभागी झाले आहेत. या बैठकीतून सत्तास्थापनेचा अंतिम तोडगा निघणार की अजून वाट पाहावी लागणार हे उद्या स्पष्ट होईल. या बैठकीत निर्णय झाल्यानंतर शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करणार, असं सांगितलं जात आहे.

या बैठकीसाठी ठाकरे, पवार, पटेल, खर्गे यांच्यासह राष्ट्रवादीचे अजित पवार, नवाब मलिक, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर आदित्य आणि मिलिंद नार्वेकरसुद्धा नेहरू सेंटरमध्ये होते. याशिवाय खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हेदेखील आधीच या बैठकीच्या ठिकाणी उपस्थित होते.

वाचा - महाविकासआघाडीच्या बैठकीत काय ठरलं? हे आहेत 10 महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या बैठक मुंबईत सुरू आहे. दोन तासांनी या बैठकीतून शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाहेर पडले. "मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती झाली", अशी मोठी बातमी शरद पवार यांनी या महाबैठकीतून बाहेर आल्यानंतर दिली. याचा अर्थ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचं उत्तर या बैठकीतून समोर आलं आहे. उद्धव यांनी मात्र याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला. अजूनही बैठक सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

वाचा - MPSC परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, या तारखांना होतील स्पर्धापरीक्षा

"मला अर्धवट माहिती द्यायची नाही. जेव्हा आम्हाला काही सांगण्यासारखं असेल तेव्हा तीनही पक्ष सांगू. सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देऊ", असं उद्धव म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना -भाजप युतीचं सरकार बहुमत असूनही अस्तित्वात येऊ शकलं नाही आणि तिढा निर्माण झाला. आता पुरेसं संख्याबळ मिळवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापण्याच्या प्रयत्नात आहेत. सत्तावाटपाच्या फॉर्म्युला काय यावरून शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली आता या नव्या महाविकास आघाडीत सत्तावाटप कुठल्या फॉर्म्युल्यावर ठरणार याविषयी उत्सुकता आहे. सत्तेच्या समसमान वाटपाबद्दल राष्ट्रवादी आणि काँग्रेस आग्रही असल्याचं बोललं जात आहे. पण मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यात दोन्ही काँग्रेसचा आक्षेप नाही, असं कळतं.

वाचा - महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती

शिवसेनेचाच मुख्यमंत्री असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत निकालाच्या दिवसापासून म्हणत असले, तरी शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या महाविकासआघाडीच्या संयुक्त बैठकीत शिवसेना आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार, असं सांगितलं जात आहे.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: November 22, 2019, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading