मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /खासगी रुग्णालयांना ठाकरे सरकारचा दणका, Mucormycosisच्या उपचारासाठी दर ठरले

खासगी रुग्णालयांना ठाकरे सरकारचा दणका, Mucormycosisच्या उपचारासाठी दर ठरले

Mucormycosis Treatment Rate: म्युकरमायकोसिस (mucormycosis)साठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबवण्यासाठी  आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या (private hospitals) उपचाराचे दर निश्चित करण्यात आलेत.

Mucormycosis Treatment Rate: म्युकरमायकोसिस (mucormycosis)साठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या (private hospitals) उपचाराचे दर निश्चित करण्यात आलेत.

Mucormycosis Treatment Rate: म्युकरमायकोसिस (mucormycosis)साठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या (private hospitals) उपचाराचे दर निश्चित करण्यात आलेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 04 जून: राज्यात एकीकडे कोरोनासारख्या महामारीचा संकट असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी नवी समस्या निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या राज्यात वाढताना दिसतेय. म्युकरमायकोसिस (mucormycosis)साठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या (private hospitals) उपचाराचे दर निश्चित करण्यात आलेत. (Mucormycosis Treatment Rate)

म्युकरमायकोसिस वरील खासगी उपचारांचे खर्च नियंत्रित करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावास मंजुरी दिली असून नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या रोगावरील शहरी आणि ग्रामीण भागात उपचाराचे निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारता येणार नाही आहे.

शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित करण्यात आले आहेत. यात निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. दरांसाठी शहरांच्या दर्जानुसार वर्गीकरण करण्यात आलं आहे. A,B, C (अ, ब, क) अशा गटात शहरे आणि भागांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरी आणि ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असेल. तसंच पर्यायाने ग्रामीण भागात तुलनेनं कमी खर्चात उपचार शक्य होतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रुग्णांची लाखो रूपयांची बिल लूट थांबणार आहे.

हेही वाचा- पुणेकरांसाठी गुड न्यूज! रिकव्हरी रेट ठरला देशात सर्वाधिक, लसीकरणाचा आकडा 11 लाखांवर

दरम्यान जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही या अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली आहे.

जाणून घ्या म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठीचे नवे दर

वॉर्ड आणि आयसोलेशन ( प्रती दिवस)

अ वर्ग शहरांसाठी 4000 हजार रुपये

ब वर्ग शहरांसाठी 3000 हजार रुपये

क वर्ग शहरांसाठी 2400 रुपये

यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधे, बेड्सचा खर्च आणि जेवण याचा समावेश असेल. म्युकरमायकोसिस चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या आणि तपासणी तसेच उच्च पातळीवरील औषधी यातून वगळण्यात आलीत.

ICU सोडून व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन

अ वर्ग शहरांसाठी 7500 रुपये

ब वर्ग शहरांसाठी 5500 रुपये

क वर्ग शहरांसाठी 4500 रुपये

यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधे, बेड्सचा खर्च आणि जेवण याचा समावेश. कोविड चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या आणि तपासणी तसेच उच्च पातळीवरील औषधी यातून वगळण्यात आली आहेत.

ICU सह व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन

अ वर्ग शहरांसाठी 9000 हजार रुपये

ब वर्ग शहरांसाठी 6700 हजार रुपये

क वर्ग शहरांसाठी 5400 हजार रुपये

अ वर्ग शहर- मुंबई, पुणे, नागपूर

ब वर्ग शहर- नाशिक, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई- विरार, मालेगाव, नांदेड, सांगली

क वर्ग -शहर भागात अ आणि ब वर्ग शहरांव्यतिरिक्तचे इतर सर्व जिल्हा मुख्यालये यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Maharashtra