मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे-फडणवीस सरकारने शरद पवारांच्या जवळच्या नेत्याला केलं टार्गेट; नेमकी खेळी काय?

शिंदे-फडणवीस सरकारने शरद पवारांच्या जवळच्या नेत्याला केलं टार्गेट; नेमकी खेळी काय?

शिंदे-फडणवीस सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे नेत्याला अडचणीत आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या नेत्याचं वर्चस्व असलेल्या दूध संघात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपांचा धागा पकडत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे नेत्याला अडचणीत आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या नेत्याचं वर्चस्व असलेल्या दूध संघात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपांचा धागा पकडत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे नेत्याला अडचणीत आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या नेत्याचं वर्चस्व असलेल्या दूध संघात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपांचा धागा पकडत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Chetan Patil

जळगाव, 28 जुलै : शिंदे-फडणवीस सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे नेत्याला अडचणीत आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या नेत्याचं वर्चस्व असलेल्या दूध संघात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपांचा धागा पकडत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्हा दूध संघातील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी शासनाकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य शासनाचे उपसचिव एन. बी. मराळे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. चौकशी समितीत 5 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीला 20 ऑगस्ट 2022 पर्यंत चौकशी करून अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दूध संघात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला होता. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तक्रारीची दखल घेत संघाचं दूध संचालक मंडळ बरखास्त केलं आहे. तसेच चौकशीसाठी समिती गठीत केली आहे.

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दूध संघात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार दूध संघाचे माजी कर्मचारी नागराज जनार्दन पाटील यांनी शासनाकडे केली होती. पाटील यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर चौकशी समिती गठीत झाली आहे. दूध संघाच्या संचालक मंडळासह कार्यकारी संचालकांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार नागराज पाटील यांनी केली होती.

दरम्यान या प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "ही मोठी राजकीय खेळी आहे. दूध संघाच्या कारभारात एक रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही", असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

नागराज पाटील यांचा नेमका आरोप काय?

"मी जळगाव जिल्हा दूध संघाचा माजी मुख्य सुरक्षा अधिकारी आहे. 1995 मध्ये जळगाव जिल्हा दूध संघ आर्थिक डबघाईला आला. त्यानंतर जळगाव जिल्हा दूध संघाचं व्यवस्थापन 1995 पासून ते 2015 पर्यंत गुजरातमधील आनंद येथील नॅशनल डेअरी डेव्हलोपमेंट बोर्डकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. 1995 ते 2013 पर्यंत जळगाव जिल्हा दूध संघाचं कामकाज बेकायदेशीर चालत आहे, असं माझ्या लक्षात आलं तेव्ही मी त्यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दखल घेतली नाही म्हणून मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली", असं नागराज पाटील यांनी सांगितलं.

(देवेंद्र फडणवीसांनी बाह्या सरसावल्या, 91 नगरपरिषदांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणासाठी आखला प्लान)

"कोर्टाने आदेश दिल्यानंतर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी 114 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण याप्रकरणी अजून तपास झालेला नाही. पोलीस व्यवस्थित तपास करत नाहीत कारण त्यामध्ये मोठमोठे मासे अडकलेले आहेत. 2013 मध्ये मी तक्रार केल्यानंतर शासनाला जाग आली त्यांनी त्यांचं प्रशासकीय मंडळ बाजूला केलं आणि त्याऐवजी मनोज लिमये नावाच्या अधिकाऱ्याला कार्यकारी संचालकपदी नेमलं. हे अधिकारी 2013 ते 2018 पर्यंत कार्यरत होते", असं नागराज यांनी सांगितलं.

"2015 मध्ये जळगाव जिल्ह्याचे विद्यमान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे युतीच्या सरकारमध्ये 13 खात्यांचे मंत्री होते. पण त्यांना पुढे आपल्या मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. ऑगस्ट 2015 मध्ये दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचं पॅनल जिंकून आलं होतं. तेव्हापासून मंदा खडसे या एकनाथ खडसेंच्या पत्नी आज डेअरीच्या चेअरमन म्हणून कार्यरत आहेत", असं नागराज पाटील यांनी सांगितलं.

First published:

Tags: Eknath khadse, Sharad Pawar (Politician)