मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सरकारचं 'दिवाळी पॅकेज' 100 रुपयांनाच का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

सरकारचं 'दिवाळी पॅकेज' 100 रुपयांनाच का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

CM Eknath Shinde on Diwali

CM Eknath Shinde on Diwali

दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने गोरगरिब जनतेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दारिद्रय़रेषेखालील सुमारे दीड कोटी कुटुंबांना नाममात्र दरात रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल आदी वस्तू देण्यात येणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 4 ऑक्टोबर : दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने गोरगरिब जनतेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दारिद्रय़रेषेखालील सुमारे दीड कोटी कुटुंबांना नाममात्र दरात रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल आदी वस्तू देण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. दारिद्रयरेषेखालील तब्बल एक कोटी ६२ लाख ४२ हजार रेशन कार्डहोल्डर्सना म्हणजेच जवळपास 7 कोटी जनतेला अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिलं जाणार आहे, यामुळे सरकारवर 500 कोटी रुपयांचा ताण पडणार आहे.

राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या या दिवाळी पॅकेजमध्ये 1 किलो रवा, चणाडाळ, साखर आणि तेल मिळणार आहे. दसऱ्याआधी ही गोड बातमी आम्ही राज्यातील जनतेला दिली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. सरकारला 100 दिवस होत आहेत, त्यामुळे या वस्तू आम्ही 100 रुपयांमध्ये देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. घरगुती गॅसपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. अशा परिस्थितमध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांची आणि गरजूंची दिवाळी गोडाधोडाची व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Diwali