मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Maharashtra UNLOCK BREAKING: राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक; 18 जिल्हे पूर्णपणे Unlock, पाहा कुठल्या जिल्ह्यात काय स्थिती

Maharashtra UNLOCK BREAKING: राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक; 18 जिल्हे पूर्णपणे Unlock, पाहा कुठल्या जिल्ह्यात काय स्थिती

Maharashtra UNLOCK: महाराष्ट्र सरकारने नियमांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra UNLOCK: महाराष्ट्र सरकारने नियमांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra UNLOCK: महाराष्ट्र सरकारने नियमांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbमुंबई, 3 जून: राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक (Maharashtra unlock in 5 levels) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत सर्व सेवा, सुविधा सुरू होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांत काही निर्बंध लागू असणार आहेत. उद्यापासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.

आठवड्याला आढावा घेऊन निर्णय

दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेणार आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट बघून जिल्ह्यांचे टप्पे बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहितीही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

कुठल्या जिल्ह्यात किती टप्प्यांचा समावेश?

पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे - सर्व 18 जिल्हे अनलॉकचा निर्णय

दुसर्‍या टप्प्यात 5 जिल्हे

तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्हे

चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यांचा समावेश

असे आहेत 5 टप्पे

पहिला टप्पा - ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन २५ टक्के बेड आत आहे तिथ लांकडाऊन राहणार नाही. मॉल्स हॉटेल्स दुकाणे वेळेचे बंधन नाही.

खालील सेवांना परवानगी

पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्ण सुरू होतील, चित्रपट गृह सुरू होतील.

जिम, सलून सुरू राहणार

बस 100 टक्के क्षमतेने

आंतरजिल्हा प्रवास मुभा राहणार

ई कॉमर्स सेवा सुरू राहणार

गार्डन, वॉकिंग ट्रॅकला परवानगी

थिएटर सुरू होणार

चित्रपट शूटिंगला परवानगी

पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत जमावबंदी नाही

लोकल ट्रेनचा काय निर्णय?

मुंबईत आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू होतील. सध्या मुंबईत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंदच असणार आहेत. ठाणे पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा नसेल.

Maharashtra Unlock Breaking : ठाणे संपूर्ण अनलॉक; मात्र लोकलमधून करू शकणार का प्रवास?

अनलॉक झालेले राज्यातील 18 जिल्हे

भंडारा

बुलढाणा

चंदपूर

धुळे

गडचिरोली

गोंदिया

वर्धा

जालना

लातूर

नागपूर

नांदेड

नाशिक

परभणी

ठाणे

वर्धा

वाशीम

यवतमाळ

दुसरा टप्पा - दुसऱ्या टप्प्यात एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, अहमदनगर, अमरावती, हिंगोली, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील या जिल्ह्यांत काही निर्बंध अंशत: शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दुसऱ्या टप्प्यात खालील सेवांना परवानगी

50 टक्के हॉटेल सुरू

मॉल्स, चित्रपटगृह - 50 टक्के क्षमतेने सुरू

मुंबई लेवल 2 मध्ये असल्याने लोकल बंदच राहणार

सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के खुले

लग्न सोहळा मॅरेज हॉल 50 टक्के आणि जास्तीत 100 लोक उपस्थितीत

अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल

मिटिंग आणि निवडणूक 50 टक्के उपस्थितीत

बांधकाम, कृषी काम खुली

जीम सलुन ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू

शासकीय बस आसाम क्षमता 100 टक्के सुरू

जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल

Maharashtra unlock : पुणेकरांसाठी खूशखबर, जिल्ह्यात आता लॉकडाऊन नाही!

दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे 

अहमदनगर

अमरावती

हिंगोली

मुंबई शहर, मुंबई उपनगर

नंदुरबार

तिसरा टप्पा - तिसऱ्या टप्प्यात एकूण 10 जिल्ह्यांचा समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे

अकोला

बीड

पालघर

रत्नागिरी

सांगली

सातारा

सिंधुदुर्ग

गडचिरोली

उस्मानाबाद

तिसऱ्या टप्प्यात काय सुरू

अत्याआवश्यक दुकाने सुरू राहणार

सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने, सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील

मॉल्स थेटर्स सर्व बंद राहतील

सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्यंत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील

लोकल बंद राहतील

मांर्निंक वॉक, मैदाने, सायकलिंग पाहटे 5 ते सकाळी 9 मुभा

50 टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू

आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार

स्टुडिओत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल

मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के दुपारी 2 पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार

लग्नसोहळ्याला 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोक मुभा असतील

बांधकाम दुपारी दोन पर्संत मुभा

कृषी सर्व कामे मुभा

ई कॉमर्स सेवा दुपारी 2 पर्यंत सुरू

जमावबंदी \ संचारबंदी कायम राहील

चौथ्या टप्प्यात दोन जिल्ह्यांचा समावेश 

पुणे

रायगड

चौथ्या टप्प्यात काय सुरू?

अत्यावश्यक सेवा 2 वाजेपर्यंत सुरु

सरकारी खासगी कार्यालयात 25 टक्के उपस्थिती राहणार

क्रीडा पाच ते 9 आऊटडोअर सुरु राहणार

सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम नाही

लग्न सभारंभाला 25 लोकांची उपस्थिती ठेवता येणार

अंतयात्रेला 20 लोक उपस्थित राहणार

बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार

शेतीची कामं 2 वाजेपर्यंत करता येणार

ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध

संचार बंदी लागू असणार

सलून, जिम 50 टक्के क्षमता सुरु राहणार,

बसेस 50 टक्के विना उभे राहणारे प्रवाशी

पाचवा टप्पा - उर्वरित सर्व जिल्ह्यांचा पाचव्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. पाचव्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. तेथे निर्बंध कठोर असणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Mumbai