मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लग्न समारंभासाठी हॉलमध्ये 100 पेक्षा जास्त जणांना जमण्यास बंदी, महाराष्ट्र सरकारकडून नवे निर्बंध जाहीर

लग्न समारंभासाठी हॉलमध्ये 100 पेक्षा जास्त जणांना जमण्यास बंदी, महाराष्ट्र सरकारकडून नवे निर्बंध जाहीर

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

ओमायक्रोनच्या संसर्गाचा वेग हा डेल्टा व्हेरिएंटच्या मानाने कित्येक पटीने जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार सावध झालं आहे.

मुंबई, 24 डिसेंबर : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या नव्या विषाणूने चिंता वाढवली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात (Maharashtra) ओमायक्रोनबाधितांचा आकडा 100 च्या पार गेला आहे. ओमायक्रोनच्या संसर्गाचा वेग हा डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta variant) मानाने कित्येक पटीने जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) सावध झालं आहे. खरंतर केंद्र सरकारनेच ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना काही महत्त्वपूर्ण सूचन दिल्या होत्या. यामध्ये गरज पडल्यास नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागू करण्याचे आदेश दिले होते. केंद्राकडून मिळालेल्या या सूचनेनंतर लगेच मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh) काल रात्रीची संचारबंदी जाहीर झाली. त्यानंतर आज उत्तर प्रदेश (UP) आणि हरियाणा (Haryana) या दोन राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला. त्यापाठोपाठ गुजरातमध्ये (Gujrat) रात्रीची जमावबंदी आणि आठ शहरांमध्ये संचारबंदी घोषित करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडूनही रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदीची (Section 144) घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे फक्त जमावबंदीच नाही तर महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीत लग्न समारंभांपासून (Marriage) वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी नवे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.

लग्न समारंभासाठी नेमके नियम काय?

लग्न जर बंदीस्त हॉलमध्ये असेल तर तिथे उपस्थित नागरिकांची संख्या ही 100 पेक्षा जास्त असू नये. तसेच लग्न खुल्या जागेवर असेल तर तिथे 250 पेक्षा जास्त नागरिक असू नये किंवा क्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त नागरिक असू नये, अशी नियमावली महाराष्ट्र सरकारकडून घोषित करण्यात आली आहे.

इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी काय नियम?

लग्न वगळता इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी देखील नियमावली जारी करण्यात आली आहे. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल तेवढे नागरिक तिथे सहभागी व्हावेत, असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी, अनिल परब यांची मोठी घोषणा

नेमके काय-काय निर्बंध ?

1) संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.

2) लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

3) इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

4) उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी  क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल.  अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

5) क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

6) वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

हेही वाचा : हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार?

7) उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील.  या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

8) याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

9) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

First published:
top videos