मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सरकारी कार्यालयं सुरू राहणार; जितेंद्र आव्हाड यांची माहिती चुकीची, Tweet केलं डिलीट

सरकारी कार्यालयं सुरू राहणार; जितेंद्र आव्हाड यांची माहिती चुकीची, Tweet केलं डिलीट

जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटनंतर अनेक माध्यमांनी सरकारी कार्यालयं बंद राहणार अशा बातम्या दिल्या. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी आव्हाड यांनी हे ट्वीट डिलिट केलं. यानंतर याविषयी स्पष्टीकरणही दिलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटनंतर अनेक माध्यमांनी सरकारी कार्यालयं बंद राहणार अशा बातम्या दिल्या. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी आव्हाड यांनी हे ट्वीट डिलिट केलं. यानंतर याविषयी स्पष्टीकरणही दिलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटनंतर अनेक माध्यमांनी सरकारी कार्यालयं बंद राहणार अशा बातम्या दिल्या. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी आव्हाड यांनी हे ट्वीट डिलिट केलं. यानंतर याविषयी स्पष्टीकरणही दिलं आहे.

मुंबई, 17 मार्च : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी कार्यालयं 7 दिवस बंद राहणार अशा अर्थाचं Tweet कॅबिनेट मंत्री असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी लिहिलं होतं, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना असा निर्णय झाला नसल्याची माहिती दिली. कमी उपस्थितीत कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न करू, असं ते म्हणाले.' ट्रेन आणि बस या अत्यावश्यक सेवा असल्याने त्याही बंद होणार नाहीत', असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. "मुंबईत किंवा राज्यात लॉकडाउन नाही. लोकांनी स्वयंस्फूर्तीने गर्दी टाळावी. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटनंतर अनेक माध्यमांनी सरकारी कार्यालयं बंद राहणार अशा बातम्या दिल्या. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी आव्हाड यांनी हे ट्वीट डिलिट केलं. मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल चुकीचं ट्वीट करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी यानंतर याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. "माझा सोशल मीडिया सांभाळणाऱ्या शंभुराजे ढवळे या मुलाने स्वत:हून ट्वीट केलं होतं. मी सांगितलं नव्हतं," असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.  त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असंही आव्हाड म्हणाले. महाराष्ट्रात Coronavirus ने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 41 वर पोहोचली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गर्दीला आळा घालण्यासाठी रेल्वे आणि बससेवा बंद करण्याविषयी चर्चा झाली. पण मुंबईत लोकल आणि बससेवा बंद राहणार नाहीत, असा मोठा निर्णय घेण्यात आला. सरकारी कार्यालयंसुद्धा सुरू राहतील. पण सर्व कार्यालयात 50 टक्के उपस्थितीतच काम करणं शक्य होईल, असा प्रयत्न करण्यात येणार आहे, असं ठाकरे म्हणाले. वाचा - Fact Check: आदित्य ठाकरेंनी आदेश देताच 'फिल्म सिटी बंद', वाचा काय आहे सत्य राज्यभर वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी राज्य शासन कठोर उपाययोजना करणार असल्याचं स्पष्ट आहे. राज्यात Covid-19 पॉझिटिव्ह असलेल्या पहिल्या रुग्णाचा 17 मार्चला मृत्यू झाला. तो मुंबईत दाखल होता. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ उडाली आहे. मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं. वाचा - मुंबई, पुणे आणि नागपूरहून सुटणाऱ्या 23 एक्स्प्रेस रद्द, ही आहे संपूर्ण यादी लोकल आणि बस सेवा सध्या तरी बंद होणार नसली तरी, पुढचे 7 दिवस केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आवा आहे .नागरिकांनी ई मेल मार्फत आपल्या तक्रारी कराव्यात असं आवाहन सरकार करणार आहे. मुंबई, 17 मार्च :  राज्यभर वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी राज्य शासन कठोर उपाययोजना करणार असल्याचं स्पष्ट आहे. महाराष्ट्रात Coronavirus ने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात Covid-19 पॉझिटिव्ह असलेल्या पहिल्या रुग्णाचा 17 मार्चला मृत्यू झाला. तो मुंबईत दाखल होता. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ उडाली आहे. मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं. अन्य बातम्या ...तर लोकल बंद केली जाईल, उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 ठळक मुद्दे कोरोनामुळे घरात बंदिस्त लोकांचा Video एकदा पाहा; जॅकलिन, कतरिनाचा वर्कआऊट विसराल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दुकानबंदीनंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय

Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Coronavirus, Jitendra Awhad (Person), Uddhav Thackeray (Politician)

पुढील बातम्या